गणेश विसर्जनासाठी जागा निश्चित

By admin | Published: September 26, 2015 01:44 AM2015-09-26T01:44:54+5:302015-09-26T01:44:54+5:30

महापालिकेच्या विसर्जन हौदांमध्ये विसर्जित करण्यात येणाऱ्या गणेशमूर्ती पूर्णपणे विसर्जित करण्यासाठी विशेष उपाय योजना करण्याचे आदेश राष्ट्रीय हरित

Define the place for Ganesh immersion | गणेश विसर्जनासाठी जागा निश्चित

गणेश विसर्जनासाठी जागा निश्चित

Next

पुणे : महापालिकेच्या विसर्जन हौदांमध्ये विसर्जित करण्यात येणाऱ्या गणेशमूर्ती पूर्णपणे विसर्जित करण्यासाठी विशेष उपाय योजना करण्याचे आदेश राष्ट्रीय हरित लवादाने दिले आहेत. यासंदर्भात शुक्रवारी झालेल्या बैठकीत मूर्ती विसर्जनासाठी जागा आणि नियोजन निश्चित करण्यात आल्याची माहिती एका वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्याने दिली आहे.
मूर्ती विसर्जनाबाबत निर्णय घेण्यासाठी महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, तसेच पोलीस आयुक्तांनी एकत्र येऊन दोन दिवसांच्या आत नियोजन करावे, अशा सूचनाही न्यायालयाने केल्या आहेत. शहरात दर वर्षी नदी, तलावात गणेश विसर्जन केले जाते; मात्र यानंतर होणाऱ्या जलप्रदूषणाचा विचार केला जात नाही. त्यातच दुष्काळी परिस्थिती आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई असताना विसर्जनासाठी खडकवासला धरणातून नदीत पाणी सोडले जाऊ नये, या
संदर्भात राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने दखल घ्यावी आणि पर्यावरणाची हानी करणाऱ्या प्रक्रियांवर बंदी आणावी, अशी मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली होती.
अ‍ॅड. शिवानी कुलकर्णी, सारंग यादवडकर यांनी अ‍ॅड. असिम सरोदे आणि अ‍ॅड. मृणालिनी शिंदे यांच्यामार्फत याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने पाणी सोडण्याबाबत काही निर्णय दिलेला नसला, तरी महापालिकेकडून विसर्जन हौद कशा प्रकारे केले जातात, त्यात विसर्जित केलेल्या मूर्तींचे पुढे काय केले जाते, हौदामध्ये जमा झालेल्या पाण्याचे
काय केले जाते, याची माहिती घेण्यात आली आहे. त्यानुसार महापालिकेकडून विसर्जन हौदांमध्ये संकलित
करण्यात आलेल्या मूर्तीचे योग्य
पद्धतीने पूर्ण विसर्जन करण्यासाठी
सर्व यंत्रणांनी एकत्र येऊन विशेष
उपाय योजना करण्याच्या सूचनाही दिलेल्या आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Define the place for Ganesh immersion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.