विद्यार्थी, पालक आणि शासनाची फसवणूक; पुण्यातील १५ अनधिकृत शाळांची यादी जाहीर

By प्रशांत बिडवे | Published: November 10, 2023 02:38 PM2023-11-10T14:38:32+5:302023-11-10T14:39:37+5:30

सर्व शाळांनी शाळेस शासनमान्यता नसतानाही मान्यता असल्याचे भासवून विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिले

defrauding students parents and the government List of 15 unauthorized schools in Pune announced | विद्यार्थी, पालक आणि शासनाची फसवणूक; पुण्यातील १५ अनधिकृत शाळांची यादी जाहीर

विद्यार्थी, पालक आणि शासनाची फसवणूक; पुण्यातील १५ अनधिकृत शाळांची यादी जाहीर

पुणे: शासनाची मान्यता नसतानाही शाळा सुरू करीत विद्यार्थी, पालक आणि शासनाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हवेली पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकारी निलिमा म्हेत्रे यांनी बुधवारी दि. ८ राेजी तालुक्यातील १५ अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली आहे

सर्व शाळांनी शाळेस शासनमान्यता नसतानाही मान्यता असल्याचे भासवून विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिले आहेत. विद्यार्थ्यांकडून प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे जमा करणे, अधिकार नसताना पालकाकडुन शुल्क वसुल करून आर्थिक गैरव्यवहार करणे, शासकीय नियमांचे पालन न करणे, विद्यार्थ्यांची अनधिकृतरीत्या पटावर नोंदणी करणे, अन्य शाळांकडुन नियमबाह्यरीत्या दाखला मागणी करणे, शासनाचा महसूल बुडवुन शासन, पालक व विद्यार्थ्यांची फसवणुक केली आहे तसेच काहींनी शाळा बंद केलेबाबत शिक्षण विभागास दिशाभूल करणारी माहिती दिली आहे. याहस आरटीई कायदा व स्वयंअर्थसहाय्यित कायदा उल्लंघन करणे. शासन नियमानुसार भौतिक सुविधा उपलब्ध नसणे, शाळेच्या दर्शनी भागावर शाळा मान्यता क्रमांक, संलग्नता क्रमांक, युडायस क्रमांक प्रदर्शित केले नसल्याचेही दिसून आले आहे.

अनधिकृत शाळांची यादी पुढीलप्रमाणे : १. नारायणा ई.टेक्नो. स्कूल, वाघोली, २. श्रीमती. सुलोचनाताई झेंडे सेमी इंग्लीश स्कूल, कुंजीरवाडी, ३. न्यु विजडम इंटरनॅशनल स्कुल पेरणे फाटा, ४. मारीगोल्ड इंटरनॅशनल स्कूल, कदमवस्ती, सोलापूर रोड, ५. द टायग्रीस इंटरनॅशनल स्कूल कदमवस्ती सोलापूर रोड, ६. रामदरा सीटी स्कूल, लोणीकाळभोर, ७.स्मार्ट किड्स इंग्लिश स्कूल, आव्हाळवाडी, वाघोली, ८.विठ्ठल तुपे ई-लर्निंग स्कूल पिंपरी सांडस, ९. रिव्हरस्टाेन इंटरनॅशनल स्कूल, पेरणे, १०.ग्यानम ग्लोबल स्कूल उरुळी देवाची, ११. कल्पवृक्ष इंग्लिश स्कूल, किरकटवाडी, १२. क्रेझ इंग्लिश मिडीयम स्कूल, कोल्हेवाडी,खडकवासला, १३. पुणे इंटरनॅशनल स्कूल, अष्टापूर मळा, लोणीकाळभोर, १४. छत्रभुज नरसी स्कूल, अमनोरा पार्क टाऊन, साडेसतरानळी, हडपसर आणि १५. बिब्ग्याेर स्कूल केसनंद, ता. हवेली. या शाळांचा समावेश आहे.

Web Title: defrauding students parents and the government List of 15 unauthorized schools in Pune announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.