Pune Crime : जामिनासाठी 'त्याने' न्यायालयात दिली बनावट कागदपत्रे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2022 09:42 PM2022-11-01T21:42:10+5:302022-11-01T21:45:01+5:30

बनावट कागदपत्रे तयार करून ती शिवाजीनगर येथील न्यायालयात सादर करून फसवणूक करण्याचा प्रयत्न....

Defrauding the court by forging documents for bail pune crime news | Pune Crime : जामिनासाठी 'त्याने' न्यायालयात दिली बनावट कागदपत्रे

Pune Crime : जामिनासाठी 'त्याने' न्यायालयात दिली बनावट कागदपत्रे

Next

पुणे: निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाच्या खुनातील आरोपी तसेच दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील आरोपीच्या जामिनासाठी बनावट कागदपत्रे तयार करून ती शिवाजीनगर येथील न्यायालयात सादर करून फसवणूक करण्याचा प्रयत्न समोर आला आहे.

याप्रकरणी फौजदारी न्यायालय क्रमांक ४चे सहायक अधीक्षक विनायक जाधव यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रतीक बाळासाहेब वाळके (रा. चिखली), समाधान पांडुरंग सोनार (वय २८, रा. कोथरुड) आणि त्यांच्या साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार शिवाजीनगर न्यायालयातील कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयात २० ऑक्टोबर रोजी घडला होता.

विश्रामबाग पोलिसांनी ४ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजता ओंकारेश्वर मंदिराच्या मागील बाजूला दरोड्याच्या तयारी असलेल्या तिघांना पकडले होते. त्यांच्याकडून १ लाख १६ हजार रुपयांचा माल व दरोड्याचे साहित्य जप्त केले होते. हे सर्व जण आंध्र प्रदेशातील नेल्लूर जिल्ह्यातील राहणारे आहेत. त्यातील फिलीप नागराज समुद्रला याच्या जामिनाकरिता बनावट कागदपत्रे तयार करण्यात आली.

निवृत्त पोलीस अधिकारी रघुनाथ खैरे यांचे पुत्र नरेंद खैरे (वय ३३) यांच्याबरोबर पार्किंगमध्ये गाडी लावण्यावरून २६ जून रोजी रात्री वाद झाला होता. तेव्हा टोळक्याने त्यांना मारहाण करून त्यांचा खून केला होता. या खुनाच्या गुन्ह्यात भारती विद्यापीठ पोलिसांनी इतरांबरोबर रमेश इंद्रसिंग परिवार याला अटक केली होती. जामिनाकरिता त्याच्या नावावर कोणतीही मालमत्ता नसतानाही आरोपींनी हवेली तालुक्यातील चिखली येथे जमीन असल्याची बनावट कागदपत्रे व ७/१२चा उतारा तयार करून तो न्यायालयात सादर केला. न्यायालयाची फसवणूक केल्याचे समोर आल्यानंतर गुन्हा दाखल केला असून, सहायक पोलीस निरीक्षक माने तपास करीत आहेत.

Web Title: Defrauding the court by forging documents for bail pune crime news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.