देहू नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा, भाजपला केवळ एका जागेवर समाधान
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 01:46 PM2022-01-19T13:46:30+5:302022-01-19T14:07:13+5:30
जाणून घ्या सविस्तर निकाल...
देहूगाव: देहू नगरपंचायतीच्या बहू प्रतिक्षित निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसने 17 पैकी 14 जागांवर विजय मिळाला आहे. भाजपला मात्र याठिकाणी आपला प्रभाव पाडता आला नाही. मात्र प्रभाग आठ मध्ये माजी सरपंच रत्नमाला करंडे यांचा भाजपाच्या पूजा काळोखे यांनी पराभूत केल्याने त्याचीच सर्वत्र चर्चा आहे. प्रभाग क्रमांक 3 मध्ये शिवसेनेच्या विद्यमान जिल्हा परिषद सदस्या शैला खंडागळे यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले. माजी सरपंच सुनिता टिळेकर, माजी उपसरपंच अभिजित काळोखे व माजी सदस्य सचिन विधाटे यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले. योगेश परंडवाल या पूर्वी ग्रामपंचायत सदस्य राहिले आहेत. तर माजी उपसरपंच स्वप्नील काळोखे यांच्या पत्नी अपेक्षे प्रमाणे निवडून आल्या आहेत.
सविस्तर निकाल खालीलप्रमाणे-
प्रभाग क्रमांक 1- मीना कुऱ्हाडे, (विजयी) राष्ट्रवादी कॉग्रेस, पडलेली मते. 638, नरेंद्र कोळी (पराभूत) भाजपा- पडलेली मते 217-
प्रभाग क्रमांक 2- रसिका काळोखे (विजयी) राष्ट्रवादी कॉग्रेस- पडलेली मते 733, शितल मराठे (पराभूत) भाजपा पडलेली मते 181.
प्रभाग क्रमांक 3- पूजा दिवटे (विजयी) राष्ट्रवादी कॉग्रेस- पडलेली मते 372, शैला खंडागळे पराभूत(शिवसेना) पडलेली मते 103.
प्रभाग क्रमांक 4- मयूर शिवशरण (विजयी) राष्ट्रवादी कॉगेस- पडलेली मते 289, प्रणव कसबे (पराभूत) भाजप- पडलेली मते 171-
प्रभाग क्रमांक 5- शितल हगवणे(विजयी) अपक्ष- पडलेली मते 256, अभिजित काळोखे (पराभूत) पडलेली मते 172.
प्रभाग क्रमांक 6- पूनम काळोखे (विजयी) राष्ट्रवादी कॉग्रेस- पडलेली मते 467, योगिता काळोखे(पराभूत) भाजपा- पडलेली मते- 266
प्रभाग क्रमांक 7- योगेश काळोखे (विजयी) अपक्ष- पडलेली मते. 650, विकास कंद (पराभूत) राष्ट्रवादी कॉग्रेस- पडलेली मते- 579,
प्रभाग क्रमांक 8- पूजा काळोके (विजयी) भाजपा- पडलेली मते- 307, अक्षता कंद (पराभूत) शिवसेना- पडलेली मते- 214,
प्रभाग क्रमांक 9- स्मिता चव्हाण (विजयी) राष्ट्रवादी कॉग्रेस- पडलेली मते- 568, स्वाती संतोष चव्हाण (पराभूत) भाजापा- पडलेली मते- 235,
प्रभाग क्रमांक 10- सुधीर काळोखे (विजयी) राष्ट्रवादी कॉग्रेस- पडलेली मते- 571, सुहास गोलांडे (पराभूत)- पडलेली मते- 80,
प्रभाग क्रमांक 11- पौर्णिमा परदेशी(विजयी) राष्ट्रवादी कॉग्रेस, पडलेली मते-288, अनिता मोरे(पराभूत)भाजपा- पडलेली मते. 243
प्रभाग क्रमांक 12- सपना मोरे (विजयी) राष्ट्रवादी कॉग्रेस- पडलेली मते- 360, सिंधूबाई मोरे(पराभूत) भाजपा- पडलेली मते. 204,
प्रभाग क्रमांक 13- प्रियंका मोरे(विजयी) राष्ट्रवादी कॉग्रेस- पडलेली मते 625. अनिता मुसुडगे(पराभूत)भाजपा- पडलेली मते- 97,
प्रभाग क्रमांक 14- प्रवीण काळोखे(विजयी) राष्ट्रवादी कॉग्रेस पडलेली मते- 318, आनंदा काळोखे (पराभूत) अपक्ष- पडलेली मते- 311-
प्रभाग क्रमांक 15- आदित्य टिळेकर (विजयी) राष्ट्रवादी कॉग्रेस- पडलेली मते- 630. प्रफुल्ल टिळेकर (पराभूत) भाजपा- पडलेली मते- 395,
प्रभाग क्रमांक 16- योगेश परंडवाल (विजयी) राष्ट्रवादी कॉग्रेस- पडलेली मते- 503, सचिन विधाटे- (पराभूत) अपक्ष- पडलेली मते- 228,
प्रभाग क्रमांक 17- ज्योती गोविंद टिळेकर(विजयी) राष्ट्रवादी कॉग्रेस- पडलेली मते. 475, सुनिता टिळेकर (पराभूत) अपक्ष- पडलेली मते- 262,