देहूगाव ग्रामपंचायतीनं विकासनिधी परत करावा, जिल्हाधिका-यांकडे मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 01:45 AM2017-10-23T01:45:01+5:302017-10-23T01:45:04+5:30
देहूगाव ग्रामपंचायतीने हद्दीतील बांधकाने नियमित करताना शासन निर्णयाचा विचार न करताच सुमारे ३०० मालमत्ताधारकांकडून घरपट्टीइतकाच जमा केलेला विकासनिधी तत्काळ परत करावा, अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर काळोखे यांनी जिल्हाधिकाºयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
देहूगाव : देहूगाव ग्रामपंचायतीने हद्दीतील बांधकाने नियमित करताना शासन निर्णयाचा विचार न करताच सुमारे ३०० मालमत्ताधारकांकडून घरपट्टीइतकाच जमा केलेला विकासनिधी तत्काळ परत करावा, अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर काळोखे यांनी जिल्हाधिकाºयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
ग्रामपंचायतीने शासनाच्या नवीन धोरणानुसार हद्दीतील बांधकामे नियमित करताना घरपट्टी वसूल करतानाच काही विकासनिधी घेण्याचे ठरविले होते. तसा ठरावही मासिक सभेत त्यांनी घेतला होता. मात्र, याबाबत ८ जुलै २०१६ च्या शासन निर्णयात मालमत्ताधारकांकडून घरपट्टीची रक्कम घेण्यात यावी, असे नमूद केले आहे. या शासन निर्णयानुसार ग्रामपंचायत प्रशासनाने व पदाधिकाºयांनी घरपट्टी घ्यायला हवी होती. गत पंचवार्षिकमध्ये असा विकास निधी घेतला जात होता. मात्र, त्यांचा दर कमी होता. याच धर्तीवर विद्यमान पदाधिकाºयांनी मासिक सभेत ठराव घेऊन जवळपास ३०० लोकांच्या मालमत्ता नोंदी केल्या. त्या पोटी घरपट्टीइतकी रक्कम
वसूल करण्याचा निर्णय घेतला होता.
मात्र, यावर आक्षेप घेतल्यानंतर तो २८ जुलै २०१७ च्या ठराव क्रमांक ४० विषय क्रमांक १० नुसार रद्द केला. याच संदर्भात दि. २२ आॅगस्ट २०१७ रोजीचा ठराव क्रमांक ६२ व दि. २७ आॅक्टोबर २०१६ चा ठराव क्रमांक ८३ हा रद्द करून विकासनिधी दोन रुपये प्रतिचौरस फूट घेण्यात यावा, असा ठराव पदाधिकाºयांनी मंजूर केला आहे. हे करताना पूर्वी ग्रामविकास निधी घेण्याबाबतच्या ठरावास ग्रामसभेत मंजुरी घेणे आवश्यक होते. मात्र, तसे न करता नागरिकांकडून असा विकासनिधी घेतला गेला आहे.
हा विकासनिधी तातडीने संबंधित मालमत्ताधारकांना परत करावा, अशी मागणी काळोखे यांनी संबंधितांकडे केली होती. मात्र, त्यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने काळोखे यांनी जिल्हाधिकारी सौरभ राव यांना याबाबत निवेदन दिले असून सदर रक्कम परत करावी, अशी मागणी केली आहे.