Bharat Gaurav Train: ‘देखो अपना देश’ दुसरी ‘भारत गौरव रेल्वे’ उद्या सकाळी पुण्याहून सुटणार

By नितीश गोवंडे | Published: May 10, 2023 04:34 PM2023-05-10T16:34:03+5:302023-05-10T16:34:25+5:30

रेल्वे उज्जैन (महाकालेश्वर आणि ओंकारेश्वर), आग्रा, मथुरा, हरिद्वार, ऋषिकेश, अमृतसर (गोल्डन टेंपल आणि वाघा बॉर्डर), वैष्णोदेवी अशी यात्रा करणार

Dekho Apna Desh second Bharat Gaurav Railway will leave Pune tomorrow morning | Bharat Gaurav Train: ‘देखो अपना देश’ दुसरी ‘भारत गौरव रेल्वे’ उद्या सकाळी पुण्याहून सुटणार

Bharat Gaurav Train: ‘देखो अपना देश’ दुसरी ‘भारत गौरव रेल्वे’ उद्या सकाळी पुण्याहून सुटणार

googlenewsNext

पुणे : रेल्वे मंत्रालयाच्या ‘देखो अपना देश’ आणि ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ योजनेंतर्गत सोडण्यात येणारी दुसरी भारत गौरव रेल्वे उद्या सकाळी साडेनऊच्या सुमारास पुणे रेल्वे स्थानकावरून सुटणार आहे. २८ एप्रिल रोजी पुण्यातूनच पहिली भारत गौरव रेल्वे दिव्य काशी यात्रेसाठी रवाना करण्यात आली होती. आता दुसरी रेल्वे उद्या ‘महाकालेश्वर, उत्तर भारत देवभूमी यात्रा’ साठी रवाना होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनानुसार देशभरातून ‘देखो अपना देश’ या संकल्पनेनुसार देशभरातून भारत गौरव सेवा पुरवली जात आहे. या सेवेच्या आतापर्यंत २९ फेऱ्या झाल्या असून, त्यातील ८ विविध राज्यांमधून तर ४ केंद्रशासित प्रदेशातून झाल्या आहेत. या रेल्वेने एकूण ७५० प्रवासी प्रवास करणार असून ११ ते २० मे दरम्यान ही रेल्वे उज्जैन (महाकालेश्वर आणि ओंकारेश्वर), आग्रा, मथुरा, हरिद्वार, ऋषिकेश, अमृतसर (गोल्डन टेंपल आणि वाघा बॉर्डर), वैष्णोदेवी अशी यात्रा करणार आहे.

प्रतिव्यक्ती दर..

- स्लीपर क्लास - १६ हजार ३००
- वातानुकूलित तृतीय श्रेणी - २८ हजार ६००
- वातानुकूलित द्वितीय श्रेणी - ३४ हजार २००

‘भारत गौरव’ रेल्वेत या सुविधा मिळणार..

- स्थानिक स्थळांची माहिती मिळणार
- सोबतीला गाइड असणार
- मुक्कामाच्या ठिकाणी हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था
- रेल्वेतच जेवणाची व्यवस्था
- हॉटेल ते रेल्वे स्थानक आणि हॉटेल ते स्थानिक स्थळांसाठी वाहनाची सोय
- पॅकेजमध्येच या सर्व बाबींचे शुल्क आकारले असल्याने, प्रवाशांना वेगळे शुल्क देण्याची गरज नाही

Web Title: Dekho Apna Desh second Bharat Gaurav Railway will leave Pune tomorrow morning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.