मेट्रोचा अहवाल केंद्राकडे पाठविण्यास विलंब

By admin | Published: November 17, 2015 03:21 AM2015-11-17T03:21:50+5:302015-11-17T03:21:50+5:30

मेट्रोच्या वनाझ ते रामवाडी या मार्गात झालेला बदल व वाढलेल्या खर्चाचा सुधारित आराखडा तयार करण्याचे काम दिल्ली मेट्रो कार्पोरेशनकडून (डीएमआरसी) करण्यात येत आहे.

Delay in sending Metro report to Center | मेट्रोचा अहवाल केंद्राकडे पाठविण्यास विलंब

मेट्रोचा अहवाल केंद्राकडे पाठविण्यास विलंब

Next

पुणे : मेट्रोच्या वनाझ ते रामवाडी या मार्गात झालेला बदल व वाढलेल्या खर्चाचा सुधारित आराखडा तयार करण्याचे काम दिल्ली मेट्रो कार्पोरेशनकडून (डीएमआरसी) करण्यात येत आहे. डीएमआरसीकडून हा अहवाल पूर्ण होण्यास आणखी एक आठवडा लागणार आहे. त्यामुळे केंद्र शासनाकडे मेट्रोचा सुधारित अहवाल पाठविण्यास विलंब होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
केंद्रीय नगरविकास मंत्री वेंकय्या नायडू यांनी वनाझ ते रामवाडी या मार्गाचा मेट्रोचा सुधारित अहवाल १५ नोव्हेंबरपर्यंत सादर करण्याच्या सूचना पुणे महापालिकेला केल्या होत्या. दिवाळी सुट्ट्या व इतर कारणांमुळे डीएमआरसीकडून अद्याप खर्चाचा सुधारित आराखडा तयार होऊ शकलेला नाही. पुढील सोमवारपर्यंत डीएमआरसीकडून तो महापालिकेला मिळू शकेल. त्यानंतर महापालिकेकडून तो केंद्राकडे पाठविला जाणार आहे. वनाझ ते रामवाडी मार्गावरील मेट्रो पूर्वी जंगली महाराज रस्त्यावरून जाणार होती; आता ती नदीकाठावरून वळविण्यात आली आहे. पूर्वीच्या मार्गामध्ये ३०० मीटरचा बदल झाला आहे. त्याबाबतचा बदल आराखड्यात केला जात आहे.
अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी सांगितले, ‘वनाझ ते रामवाडी या मेट्रो मार्गाचा जो जुना आराखडा केला होता, त्यामध्ये झालेल्या खर्चाच्या वाढीची माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. येत्या ४ ते ५ दिवसांमध्ये ते काम पूर्ण होईल. त्यानंतर तो अहवाल केंद्राला पाठविला जाईल.’
मेट्रोचा सुधारित आराखडा केंद्राकडे सादर झाल्यानंतर कॅबिनेटकडे सादर होण्यापूर्वी तो पीआयबीकडे जाणार आहे. तिथे त्यांची काटेकोर तपासणी झाल्यानंतरच त्याला कॅबिनेटची मान्यता मिळू शकणार आहे. त्याचबरोबर मेट्रोची कंपनी स्थापन करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे प्रलंबित आहे. ही प्रक्रिया वेगाने व्हावी याकरिता पुणे महापालिकेकडून सुधारित आराखडा लवकर सादर होणे आवश्यक आहे.

Web Title: Delay in sending Metro report to Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.