मैत्रीणीला इंप्रेस करण्यासाठी त्याने घातली खाकी, पोलिसांची नजर गेली अन् बिंग फुटले

By विवेक भुसे | Published: May 2, 2023 02:50 PM2023-05-02T14:50:10+5:302023-05-02T14:51:13+5:30

चतु:श्रृंगी पोलिसांनाच त्याने औंध चौकीत नेमणूकीला असल्याचे सांगितल्याने त्याचे बिंग फुटले...

delivery boy wears fake police to impress his girlfriend chatushrungi police pune news | मैत्रीणीला इंप्रेस करण्यासाठी त्याने घातली खाकी, पोलिसांची नजर गेली अन् बिंग फुटले

मैत्रीणीला इंप्रेस करण्यासाठी त्याने घातली खाकी, पोलिसांची नजर गेली अन् बिंग फुटले

googlenewsNext

पुणे : मित्र मैत्रिणींना रुबाब दाखविण्यासाठी तो खाकी गणवेश घालून फिरत होता. त्यावर पायात चप्पल घातलेल्या या तरुणाकडे पोलिसांचे लक्ष केले. चतु:श्रृंगी पोलिसांनाच त्याने औंध चौकीत नेमणूकीला असल्याचे सांगितल्याने त्याचे बिंग फुटले. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. यशवंत रमेश धुरी (वय ३०, रा. तापकीरनगर, नडे कॉलनी, काळेवाडी) असे त्याचे नाव आहे.

याप्रकरणी पोलीस हवालदार श्रीकांत वाघवले यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार औंधमधील नागरस रोडवरील राम नदीच्या पुलावर रविवारी दुपारी दीड वाजता घडला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक निलेशकुमार महाडीक व त्यांचे सहकारी हे खासगी वाहनाने पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी राम नदीच्या पुलावर एक पोलीस उभा असल्याचे त्यांना दिसले. तो अनोळखी वाटल्याने पोलिसांनी त्याला नेमणुकीस कोठे आहे, असे विचारले असता त्याने औंध चौकीला पोलीस असल्याचे सांगितले.

आपल्याच हद्दीतील चौकीत नेमणूकीला असलेल्या आपल्याला माहिती नाही. त्याचा गणवेश जरी पोलिसांचा असला तरी पायात चप्पल होती. खाकी ड्रेसच्या खांद्यावर म. पो. आणि कॅपवर पिंपरी चिंचवड पोलीस असे लिहिलेले होते. ते पाहिल्यावर तो खोटे बोलत असल्याचे लक्षात आल्यावर त्याला चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात आणले.अधिक चौकशी केली असता तो डिलिव्हरी बॉय म्हणून काम करीत असून मित्र मैत्रिणीवर एंम्पेशन मारण्यासाठी त्याने हा गणवेश घातला असल्याचे सांगितले. पोलीस हवालदार कापरे तपास करीत आहेत.

Web Title: delivery boy wears fake police to impress his girlfriend chatushrungi police pune news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.