डेल्टा व्हेरिएंट आहे आठ पट शक्तिशाली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2021 06:24 AM2021-09-08T06:24:07+5:302021-09-08T06:24:36+5:30

प्रतिकारशक्ती निष्प्रभ करण्याचे विषाणूमध्ये आहे सामर्थ्य

The Delta variant is eight times more powerful pdc | डेल्टा व्हेरिएंट आहे आठ पट शक्तिशाली

डेल्टा व्हेरिएंट आहे आठ पट शक्तिशाली

Next
ठळक मुद्दे“पुनर्निमितीची वाढलेली क्षमता’ आणि लसींमुळे किंवा नैसर्गिक बाधेतून निर्माण झालेली प्रतिपिंडे नाहीशी करण्यासाठीच्या घटलेल्या संवेदनशीलतेने ९० पेक्षा जास्त देशांमध्ये डेल्टा व्हेरिएंटचा वेगाने प्रसार होण्यात मोठी भूमिका आहे.” 

लोकमत न्यूज नेटवर्क 
पुणे/नवी दिल्ली : सार्स-कोव्ह२ विषाणूवर नव्याने झालेल्या अभ्यासात या विषाणूत बाधा करण्याची खूप जास्त क्षमता असून, आधी झालेली बाधा किंवा लसींमुळे निर्माण झालेल्या प्रतिकार शक्तीला तो निष्प्रभ करू शकतो, असे आढळले आहे. ‘नॅचरल जर्नल’मध्ये हा अभ्यास प्रकाशित झाला आहे. 
भारतातील व इतर देशातील संशोधकांच्या पथकाला डेल्टा व्हेरिएंटमध्ये (किंवा बी.१.६१७.२ लिनिएज) ॲस्ट्राझेनेका किंवा फायझर लसींमुळे मिळालेली प्रतिकारशक्ती निष्प्रभ करण्यात मूळ विषाणूच्या तुलनेत आठ पट शक्यता आढळली आहे. याशिवाय डेल्टा व्हेरिएंट हा कोविड-१९ मधून बरे झालेल्यांना पुन्हा बाधित करण्याची सहापट शक्यता आहे. 

अभ्यासात असे म्हटले आहे की, “पुनर्निमितीची वाढलेली क्षमता’ आणि लसींमुळे किंवा नैसर्गिक बाधेतून निर्माण झालेली प्रतिपिंडे नाहीशी करण्यासाठीच्या घटलेल्या संवेदनशीलतेने ९० पेक्षा जास्त देशांमध्ये डेल्टा व्हेरिएंटचा वेगाने प्रसार होण्यात मोठी भूमिका आहे.” 
संशोधकांनी दिल्लीत तीन रुग्णालयांतील जवळपास पूर्ण लसीकरण झालेल्या ९ हजार आरोग्य कामगार, कर्मचाऱ्यांमध्ये बाधा झाली का याचा अभ्यास केला. 

देशव्यापी मोहिमेत ७० कोटींचे लसीकरण

n    देशात यावर्षी १६ जानेवारीपासून सुरू झालेल्या मोहिमेत आतापर्यंत ७० कोटींपेक्षा जास्त लोकांना कोविड-१९ वरील लस दिली गेली आहे. यातील शेवटच्या १० कोटी लसमात्रा फक्त १३ दिवसांतील आहेत, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी म्हटले. 
n    कोरोना विषाणूला पराभूत करायचे असून, लसीकरण हा त्या विजयाकडील मार्ग आहे, असे आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विटरवर म्हटले. या मोठ्या यशाबद्दल मांडविया यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांचे आणि जनतेचे अभिनंदन केले आहे. 

n    ८५ दिवसांत १० कोटी लोकांचे लसीकरण, ४५ दिवसांत २० कोटींचा टप्पा ओलांडला आणि ३० कोटींचा टप्पा गाठण्यासाठी आणखी २९ दिवस लागले.

n    ४० कोटींची पायरी गाठण्यासाठी २४ दिवस लागले, तर ५० कोटींचा टप्पा आणखी २० दिवसांत गाठला. 

n    आणखी १९ दिवसांत ६० कोटींचा आणि फक्त १३ दिवसांत पुढील १० कोटी लोकांपर्यंत लस पोहोचली, असेही ते म्हणाले.

निपाह : केरळातील सर्वच्या
सर्व २४ नमुने निगेटिव्ह 
n    निपाह विषाणूच्या संशयामुळे केरळमधील ८ जणांचे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरालॉजीला पाठवलेले सर्व २४ नमुने निगेटिव्ह निघाले आहेत.
n    केरळच्या आरोग्यमंत्री विणा जॉर्ज यांनी सांगितले की, आम्ही आणखी नमुन्यांची तपासणी करत आहोत. घरोघरी जाऊन सर्व्हे केला जात आहे.

Web Title: The Delta variant is eight times more powerful pdc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.