कोविड लसीकरण केंद्रे २४ तास सुरू ठेवण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:11 AM2021-03-26T04:11:21+5:302021-03-26T04:11:21+5:30
धायरी : एकीकडे पुणे शहरात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना दुसरीकडे मात्र नागरिकांना लस मिळण्यास विलंब होत आहे. कोरोना ...
धायरी : एकीकडे पुणे शहरात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना दुसरीकडे मात्र नागरिकांना लस मिळण्यास विलंब होत आहे. कोरोना लसीकरण मोहिमेचा वेग वाढविण्यासाठी वेळेची मुदत काढून टाकत लसीकरण केंद्र २४ तास खुले करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे खडकवासला मतदारसंघाचे कार्याध्यक्ष शरद दबडे यांनी केली आहे.
कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा झपाट्याने वाढत असल्याने लसीकरण वेगाने करण्याची गरज आहे. त्यामुळे आता लसीकरणासाठी नऊ ते पाच वेळची अट न ठेवता महापालिकेने शहरात सगळीकडे २४ तास लसीकरण केंद्र सुरू करण्याची गरज आहे. शहरातील नागरिक त्यांच्या सोयीनुसार जवळच्या केंद्रात २४ तासांत केव्हाही जाऊन लस घेऊ शकतात. सध्या लसीकरण केंद्रावर कर्मचारी कमी आहेत, तसेच लसीचा पुरवठा कमी होत आहे, शिवाय लसीकरण केंद्रे कमी असल्याने नागरिकांना रांगेत उभे राहून लस टोचून घ्यावी लागते. महापालिकेने लसीकरण केंद्रांची संख्या वाढवावी, त्याचबरोबर सध्या असणाऱ्या लसीकरण केंद्रावरील कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी व लसीकरण केंद्र हे २४ तास खुले ठेवावे अशी मागणी दबडे यांनी महापालिकेकडे केली आहे.