लाटे येथील ठेकेदारावर कारवाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:16 AM2021-08-17T04:16:02+5:302021-08-17T04:16:02+5:30

खासदार सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तालुक्याचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून इतर तालुक्यांपेक्षा बारामतीला जास्तीचा निधी देतात. सर्व ...

Demand for action against the contractor at Latte | लाटे येथील ठेकेदारावर कारवाईची मागणी

लाटे येथील ठेकेदारावर कारवाईची मागणी

googlenewsNext

खासदार सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तालुक्याचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून इतर तालुक्यांपेक्षा बारामतीला जास्तीचा निधी देतात. सर्व कामे खासदार, आमदार, डीपीडीसी, जिल्हा परिषद फंडातून होतात. सर्व कामे पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन ठेकेदाराकडून चांगल्या दर्जाची कामे व्हावीत अशी अजित पवारांची रास्त अपेक्षा असते. त्या अनुषंगाने लाटे येथे जिल्हा परिषदेच्या जनसुविधा योजनेतून स्मशानभूमीच्या संरक्षण कठड्याला सुमारे ९ लाख रुपये निधी मंजूर झाला असून सदरचे काम शिरष्णे येथील मोरया मजूर संस्थेने घेतले असून त्याचे काम सब ठेकेदार म्हणून खंडोबावाडीचे सबठेकेदार धनंजय गडदरे करत आहे. सुरुवातीपासूनच काम चुकीच्या पद्धतीने निकृष्ट दर्जाचे होत असल्याने चांगले काम होण्यासाठी सरपंच शीतल खलाटे सूचना करत होते व वेळोवेळी गटविकास अधिकारी, शाखा अभियंता झारगड यांना सूचना देऊनही सबठेकेदाराने मनमानी काम सुरू ठेवल्याने सरपंच शीतल खलाटे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन लेखी तक्रार केली आहे. यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिकांबरोबर राजेंद्र खलाटे उपस्थित होते.

Web Title: Demand for action against the contractor at Latte

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.