महिला व बालविकास विभागातील रिक्त पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:15 AM2021-08-26T04:15:16+5:302021-08-26T04:15:16+5:30
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) महिला व बाल विकास विभागाच्या गट अ व ब पदांसाठी परीक्षा घेण्यात येते. ...
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) महिला व बाल विकास विभागाच्या गट अ व ब पदांसाठी परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेसाठी विशेष तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे. गेल्या तीन वर्षीपासून या पदासाठी परीक्षाच जाहीर झाली नाही. त्यामुळे विद्यार्थी परीक्षेच्या प्रतीक्षेत आहेत.
या विभागाच्या गट ब पदाच्या रिक्त जागांचे अचूक मागणीपत्र एमपीएससीला पाठवून तत्काळ भरती प्रक्रिया राबविण्यात यावी. तसेच तांत्रिक मुद्द्यांमुळे फाईल विधी व न्याय विभाग यांच्याकडे असल्याने प्रक्रिया थांबली आहे. या प्रक्रियेला वेग देऊन प्रक्रिया जलद राबविण्याची मागणी करणारे पत्र राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. २०१४ नंतर या विभागाची जाहिरातच प्रसिद्ध झाली नाही. यापूर्वीची जाहिरात केवळ गट अ साठी तीन पदांसाठी घेण्यात आली होती. त्यामुळे गट ब पदांसह गट अ ची पदे देखील मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत. त्यामुळे जाहिरात गट अ पदांसह जाहीर करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
चौकट
स्पर्धा परीक्षा क्षेत्रात १५० हून अधिक पदाची जाहिरात प्रसिद्ध होणार असल्याची चर्चा महिला व बाल विकास विभागाची परीक्षा गेल्या तीन वर्षांपासून झाली नाही. त्यामुळे अनेक रिक्त पदे झाले असल्याने येत्या आठ ते दहा दिवसांत १५० हून अधिक पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध होऊ शकते, अशी चर्चा रंगली आहे. त्यात राज्यमंत्र्यांनी पत्र लिहिल्याने या विभागाची जाहिरात प्रसिद्ध होण्याची शक्यता अधिक असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. जाहिरात प्रसिद्ध होण्याच्या मार्गावर असल्याच्या चर्चेने विशेष तयारीसाठी अनेक विद्यार्थी पुण्याच्या येणार आहेत.
चौकट
मंजूर पदे -५२९
भरलेली पदे- २६३
रिक्त पदे - २६६