तुकाईवाडीला स्वतंत्र पोलीस पाटील नेमणुकीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:11 AM2021-04-07T04:11:11+5:302021-04-07T04:11:11+5:30
वरची भांबुरवाडी आणि तुकाईवाडी या दोन ग्रामपंचायती मिळून एक महसूल गाव होते. त्याला एक पोलीस पाटील होता. मात्र डिसेंबर ...
वरची भांबुरवाडी आणि तुकाईवाडी या दोन ग्रामपंचायती मिळून एक महसूल गाव होते. त्याला एक पोलीस पाटील होता. मात्र डिसेंबर महिन्यात तुकाईवाडी गावाला स्वतंत्र महसुली गावाचा दर्जा प्राप्त झाला. त्यानंतर गावातील विविध समस्या सोडविण्यासाठी तसेच गावात सामाजिक सलोखा राखण्यासाठी पोलीस पाटील हे पद महत्त्वाचे आहे. म्हणून या पदासाठी गावातील व्यक्तीची नेमणूक व्हावी तसेच गावात तुकाईमाता मंदिर आहे. संपूर्ण घडीव आणि विविध मूर्ती असे दगडी बांधकाम असलेले हे पांडवकालीन मंदिर एक पर्यटन स्थळ आहे. या मंदिरात पर्यटक, भाविकांची नेहमीच वर्दळ असते. सण, उत्सव आणि नवरात्र काळात देवीच्या दर्शनासाठी नागरिक उपस्थित असतात. तुकाईमाता ट्रस्टच्या माध्यमातून नियोजन, संयोजन केले जाते. प्रशासकीय प्रतिनिधी असलेला स्वतंत्र पोलीस पाटील नेमणूक झाल्यास यामध्ये सुसूत्रता येईल असे सरपंच कुसुम भांबुरे, उपसरपंच साहेबराव गाढवे, भांबुरवाडीचे सरपंच , विजय थिगळे, किशोर रोडे, संपत थिगळे, प्रवीण कोरडे, सुवर्णा दरेकर ,रेश्मा कोरडे ,भारती कोरडे व ग्रामस्थांनी सांगितले त्याचप्रमाणे या मागणीचे निवेदन प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण व आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्याकडे देखील देण्यात आले आहे.
--