बेल्हा पाणीपुरवठा योजनेस मान्यता देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:07 AM2021-07-05T04:07:50+5:302021-07-05T04:07:50+5:30

आमदार अतुल बेनके यांनी सांगितले की जुन्नर तालुक्यातील मतदारसंघातील उत्तरेकडील दुष्काळी भागाला वरदान ठरणारी बेल्हा प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सन ...

Demand for approval of Belha water supply scheme | बेल्हा पाणीपुरवठा योजनेस मान्यता देण्याची मागणी

बेल्हा पाणीपुरवठा योजनेस मान्यता देण्याची मागणी

Next

आमदार अतुल बेनके यांनी सांगितले की जुन्नर तालुक्यातील मतदारसंघातील उत्तरेकडील दुष्काळी भागाला वरदान ठरणारी बेल्हा प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सन १९९५ मध्ये मंजूर होऊन पुढील काही वर्षांत कार्यान्वित झालेली आहे. सुमारे २५ वर्षांपूर्वी झालेली ही योजना आता कालबाह्य झाल्यामुळे नवीन योजना होणे आवश्यक आहे. सदर योजनेअंतर्गत बेल्हा, राजुरी, नळावणे,शिंदे वाडी,पेमदरा,आणे,गुळुंचवाडी,आळे,वडगाव आनंद,पिंपरी पेंढार,नवलेवाडी,खामुंडी,उंब्रज नं २,गायमुखवाडी,पादिरवाडी,आळेफाटा,पिंपळ वंडी- वाळुंजवाडी,पिंपळवंडी- आनंदमळा गावां चा समावेश करण्यात आलेला आहे.सदरची योजना ही दोन टप्प्यांत होणार आहे. पहिला टप्पा ३२ कोटी ८४ लक्ष रुपये व दुसरा टप्पा रक्कम ५३ कोटी ५५ लक्ष रुपये अशी अंदाजपत्रके तयार करण्यात आलेली आहे. .निवेदनात म्हटले आहे की मतदारसंघासह राज्यातील अनेक ग्रामपंचायती ह्या आर्थिकदृष्ट्या सक्षम नाहीत. त्यामुळे प्रस्तावित योजनाकरिता ही १० टक्के लोकवर्गणीची अट ही जाचक असून ती रद्द करण्याची मागणी केली आहे. शिष्टमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसचे जुन्नर तालुका प्रवक्ते भाऊसाहेब देवाडे, जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे, आळे ग्रामपंचायत सरपंच प्रितम काळे, उपसरपंच विजय कुऱ्हाडे,मारुती वायाळ,जयराम भुजबळ,नवनाथ चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते.

बेल्हा प्रादेशिक पाणीपुरवठा योजने संदर्भात मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे निवेदन देताना आमदार अतुल बेनके व इतर मान्यवर.

Web Title: Demand for approval of Belha water supply scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.