औषधाची बिले मंजूर करण्यासाठी कर्मचाऱ्याकडे लाचेची मागणी; अभियंता अधिकाऱ्यांवर लाचलुचपत विभागाची कारवाई  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2021 04:45 PM2021-08-09T16:45:46+5:302021-08-09T16:47:29+5:30

बारामती येथील प्रकार: दोघांवर बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

Demand of bribe from employee; Anti Corruption Department action on engineer officers | औषधाची बिले मंजूर करण्यासाठी कर्मचाऱ्याकडे लाचेची मागणी; अभियंता अधिकाऱ्यांवर लाचलुचपत विभागाची कारवाई  

औषधाची बिले मंजूर करण्यासाठी कर्मचाऱ्याकडे लाचेची मागणी; अभियंता अधिकाऱ्यांवर लाचलुचपत विभागाची कारवाई  

Next

सांगवी : इंदापूर तालुक्यातील पळसदेव येथील उपसा सिंचन विभागाच्या अभियंत्याने औषधाची बिले मंजूर करण्यासाठी कार्यालयातील कर्मचाऱ्याकडे लाचेची मागणी   करणं अभियंता अधिकाऱ्यास चांगलेच भोवले आहे. औषधाची बिले मंजूर करण्यासाठी कार्यालयातील कर्मचाऱ्याकडे अभियंता अधिकाऱ्याने पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. रविवारी (दि.८) रोजी संघवीनगर बारामती येथे हा प्रकार घडून आला. याबाबत संजय भिकुलाल पवार ( वय५७, रा. पांटबंधारे वसाहत, दौंड, जि. पुणे )यांनी फिर्याद दिली आहे.

संजय नारायण मेटे (वय ५२ , धंदा- शाखाधिकारी पळसदेव रा. आर्या सोसायटी,संघवीनगर, बारामती, जि पुणे), पोपट दशरथ शिंदे ( वय५८ , सहयोग सोसायटी,बारामती, जि.पुणे) अशी लाचलुचपत विभागाने अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.

संजय मेटे हा इंदापूर तालुक्यातील पळसदेव येथे उपसा सिंचन विभागात उपअभियंता म्हणून कार्यरत आहे. त्याच्याच कार्यालयातील एका कर्मचाऱ्या ने औषधाची बिले मंजूर करण्यासाठी प्रस्ताव मांडला होता, मात्र या बिल मंजुरीसाठी अधिकाऱ्याने पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. पडताळणी दरम्यान शाखाधिकारी पळसदेव यांनी फिर्यादीचे मेडीकल रजा बिल मंजुर करुन देण्याच्या बदल्यात ५ हजार रुपये मागणी केल्यानंतर ती पोपट शिंदे यांच्याकडे देण्यास सांगितले होते.

सदरची रक्कम आरोपी पोपट शिंदे यांचेकडे देण्यास सांगीतले होते. दरम्यान, बारामतीत सापळा रचून कारवाई दरम्यान गुन्हा सिद्ध झाला. पैसे देण्यास प्रोत्साहन देवुन गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य केल्याबद्दल कायदेशीर फिर्याद दिली आहे. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक भारत सांळुखे हे अधिक तपास करत आहेत.

Web Title: Demand of bribe from employee; Anti Corruption Department action on engineer officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.