अवकाळी पावसामुळे भातपिकाचे नुकसान, नुकसानभरपाई देण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2018 12:43 AM2018-11-10T00:43:20+5:302018-11-10T00:43:49+5:30
अगोदरच रोगामुळे उत्पन्नात घट आणी पुन्हा पावसाने भिजल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला असून पिकांचे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत
भोर - भोर तालुक्यात गेल्या तीन दिवसापासून अवकाळी पाउस पडत आहे. तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकऱ्यांनी खाचरात कापणी करून ठेवलेले व खळ्यावर आणून झोडणी सुरु असलेले भातपिक पावसात भिजले असून शेतक-यांचे ३० ते ३५ टक्क्यापर्यंत नुकसान झाले आहे. अगोदरच रोगामुळे उत्पन्नात घट आणी पुन्हा पावसाने भिजल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला असून पिकांचे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.
भोर तालुक्यातील भात हे प्रमुख पिक असुन ७४०० हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड करण्यात आली होती. पश्चिम भागातील हिर्डोशी, आंबवडे, महुडे, वेळवंड, भुतोंडे खोºयात मागील १५ दिवसांपासून भात काढणीच्या कामाला वेग आला आहे. मात्र ३ नोव्हेंबरला अचानक झालेल्या अवकाळी पावसाने भात खाचरात पाणी तुंबून राहिले. शेतात कापून ठेवलेले तसेच खळयावर आणुन झोडणी सुरु असलेले भात पीक पावसात भिजल्याने भात व पेंढा खराब झाला आहे. अचानक पावसाने सलग तीन दिवस हजेरी लावल्याने शेतकºयांची तारांबळ उडाली. भातपिकाचे ३० ते ३५ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. यंदा समाधानकारक पावसामुळे भाताचे पिक चांगले होते. मात्र शेवटचे दोन पाऊस मिळाले नाही. परिणामी पिकावर करप्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे पिकाचे उत्पादन घटले होते. उरले सुरले पीक दिवाळीच्या अगोदर काढावे म्हणून शेतकरी भात कापणी व झोडणीच्या घाईत होता. मात्र पुन्हा या सततच्या अवकाळी पावसामुळे मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. रायरी, साळव, कंकवाडी, करंजगाव, म्हसर बु .म्हसर खुर्द, निगुडघर, आपटी, कारी, भावेखल, अंगसुळे, पºहर, गुढे, निवंगण, शिरवली हि.मा, कुडली खुर्द व बु,दुर्गाडी अभेपुरी, शिळींब, शिरगाव, हिर्डोशी, वारवंड, देवघर, वेनुपुरी, कोंढरी आंबवडे, महुडे, वेळवंड, भुतोंडे खो-यातील पिक मोठया प्रमाणात खराब झाले आहे. आतापर्यंत ५० टक्के भाताची कापणी झाली असुन सदर पिकांचे पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करित आहेत.
पाऊस नसल्याने पिकात दाणा भरला नाही
हळव्या जातीच्या भातात पळंज निर्माण झाले. दुसरीकडे गरव्या जातीच्या भातपीक काढणी सुरु असताना अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे भाताचे पिक काळे पडले आहे. पिकावर बुरशी वाढली उत्पादनात मोठी घट होणार आहे. भोर तालुक्याला
दुष्काळाच्या यादीतुन वगळले असल्याने कशा प्रकारे नुकसानभरपाई देणार की शेतकºयांना वाºयावर सोडणार? अशी विचारणा होत आहे.