वीज पुनर्जोड रकमेमध्ये सवलतीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:12 AM2021-03-18T04:12:24+5:302021-03-18T04:12:24+5:30
आता अनेक नागरकांनी वीजबिल भरले आहे पण पुनर्जोडची रक्कम माफ करावी, अशी मागणी शिवसेना शाखा प्रमुख योगेश निंबरे, ...
आता अनेक नागरकांनी वीजबिल भरले आहे पण पुनर्जोडची रक्कम माफ करावी, अशी मागणी शिवसेना शाखा प्रमुख योगेश निंबरे, राहुल कंधारे सत्यजीत हिरवे यांनी महावितरणला निवेदनाव्दारे केली आहे. पण महावितरण पुर्नवीजजोड रक्कम नियमानुसार मागत आहे तशी कायद्यात पण त्या वीजजोड रकमेचा उल्लेख असून ती रक्कम ग्राहकाला भरावीच लागणार असल्याचे निदर्शनास आले आहे. हॅपी कॉलनीमधील नागरिक मोलमजुरी करून उपजीविका करत असल्याने वीजपुनर्जोड शुल्क भरणे त्यांना शक्यच होत नसल्याचे योगेश निंबरे सांगत आहेत. तरी ही रक्कम माफ झाली नाही तर शिवसेनेचा वतीने महावितरण कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
कोट
पुनर्जोड रक्कम माफीचा प्रस्ताव वरिष्ठ कमिटी ठरविणार. पण नियमानुसार आणि कायद्याचा तरतुदीनुसार ती रक्कम ग्राहकांना भरावीच लागणार आहे. सद्यस्थीतीत तरी सवलत देता येणार नाही.
-सुनील गवळी, कार्यकारी अभियंता महावितरण