हडपसरमधील कोविड केंद्र रविवारी सुरू ठेवण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:09 AM2021-04-24T04:09:56+5:302021-04-24T04:09:56+5:30

तपासणी संख्या किमान ४०० वाढविण्याची मागणी करूनही प्रशासन ढिम्म राहून तपासणी संख्या वाढवत नाही. त्यामुळे तपासणीला आलेल्यापैकी निम्या नागरिकांना ...

Demand for continuation of Kovid Center in Hadapsar on Sunday | हडपसरमधील कोविड केंद्र रविवारी सुरू ठेवण्याची मागणी

हडपसरमधील कोविड केंद्र रविवारी सुरू ठेवण्याची मागणी

googlenewsNext

तपासणी संख्या किमान ४०० वाढविण्याची मागणी करूनही प्रशासन ढिम्म राहून तपासणी संख्या वाढवत नाही. त्यामुळे तपासणीला आलेल्यापैकी निम्या नागरिकांना तपासणी न करता परत जावे लागते.

कोरोनाचा हाहाकार माजला असताना तपासणी, केंद्र लसीकरण केंद्र रविवारी बंद असते. अत्यंत विदारक चित्र असून चोवीस तास सुरू असणे आवश्यक आहे. बनकर कोविड सेंटरवर कर्मचारी संख्या अत्यंत कमी आहे. त्यामुळे उपस्थित कर्मचाऱ्यांवर त्याचा परिणाम होतो.

तरी डाॅक्टर, नर्सेस इतर कर्मचारी संख्या वाढवावी. विलगीकरणाचे बेडची खूप कमी असून वाढविण्याची गरज आहे. एकही ऑक्सिजन बेडची सुविधा उपलब्ध नाही. ऑक्सिजन बेड किमान १०० बेडची उपलब्ध करण्याची आवशकता आहे.

या सर्व समस्यांवर लवकरात लवकर तोडगा काढून उपाययोजना करून या कोरोना महामारीत नागरिकांना दिलासा द्यावा. असे शिवसेनेचे उपविभागप्रमुख महेंद्र बनकर यांनी सांगितले. तसेच महापालिकेने जिथे मनुष्यबळाची गरज भासेल तिथे स्वयंसेवी संस्थांची मदत घेऊन त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांची मदत घ्यावी आणि परंतु नागरिकांचे हाल होऊ देऊ नका, अशीही त्यांनी विनंती केली आहे.

Web Title: Demand for continuation of Kovid Center in Hadapsar on Sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.