गावे तीव्र दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 11:31 PM2018-11-10T23:31:51+5:302018-11-10T23:32:05+5:30
या गावांमधील ग्रामस्थांचे शहरांकडे स्थलांतर होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यासाठी डिंभे धरणाच्या उजव्या कालव्यातून
घोडेगाव : आंबेगाव तालुक्यातील लोणी, धामणी, वडगावपीर, खडकवाडी, पहाडदरा, शिरदाळे या गावांत अपुरा पाऊस पडला. त्यामुळे येथील शेतकरी पिचला असून, ही गावे तीव्र दुष्काळग्रस्त जाहीर करून येथील शेतकऱ्यांना दुष्काळाच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्या,
अशी मागणी पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखिले व शिवसेना तालुका प्रमुख सुनील बाणखेले यांनी केली आहे.
या गावांमधील ग्रामस्थांचे शहरांकडे स्थलांतर होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यासाठी डिंभे धरणाच्या उजव्या कालव्यातून उपसा जलसिंचन योजना होऊन या गावांसाठी म्हाळसाकांत पाणीपुरवठा योजना व्हावी, झाल्यास यातून पिण्यासाठी व शेतीच्या पाण्यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था होणार आहे. या भागात तातडीने चारा छावणी सुरू कराव्यात, सर्व गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करावेत, अपुºया पावसामुळे खरिपाची पिके वाया गेली आहेत, यासाठी पंचनामे होऊ न लवकरात लवकर नुकसानभरपाई दिली जावी, रेशनिंगवर मोफत धान्य मिळावे, विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ व्हावी आदी मागण्या तहसीलदार सुषमा पैकेकरी यांना निवेदन देऊन केल्या आहेत.
उपोषण करण्याचा इशारा
४ दि. १४ नोव्हेंबरपर्यंत या मागण्या पूर्ण न झाल्यास शिवसेना आंबेगाव तालुक्याच्या वतीने या भागातील सरपंच, शेतकरी सर्व मिळून लोणी येथे महादेव मंदिरासमोर उपोषण करणार असल्याचा इशारा रवींद्र करंजखिले यांनी दिला आहे.