सिद्धार्थनगरमध्ये विकासकामांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:13 AM2021-08-19T04:13:59+5:302021-08-19T04:13:59+5:30
या परिसरात नव्याने २५ स्वच्छतागृहे बांधण्यात येऊन या स्वच्छतागृहांवर पाण्याच्या टाक्या लावून प्रत्येक स्वच्छतागृहात स्वतंत्र पाणीपुरवठ्यासाठी नळजोड देण्यात ...
या परिसरात नव्याने २५ स्वच्छतागृहे बांधण्यात येऊन या स्वच्छतागृहांवर पाण्याच्या टाक्या लावून प्रत्येक स्वच्छतागृहात स्वतंत्र पाणीपुरवठ्यासाठी नळजोड देण्यात यावा. याच बरोबरीने वाढीव स्वरूपात पथदिवे बसविणे गरजेचे आहे. नवीन बौद्ध विहार परिसरात तसेच प्रभागात सिमेंट काँक्रिटीकरण करून पेविंग ब्लॉक बसवावेत सिध्दार्थनगरच्या मागील बाजूने नाला खोदलेला आहे. दरम्यान, हा नाला पाइपलाइन टाकून दुरुस्ती करणे गरजेचे आहे, अन्यथा या भागात रोगराई पसरण्यास वेळ लागणार नाही. या प्रभागात काही ठिकाणी हातपंप नादुरुस्त आहे तेव्हा नादुरुस्त हातपंप दुरुस्त करुन नवीन दहा ते पंधरा हातपंप बसवावेत. नियोजित बौद्ध विहाराच्या परिसरात शोभेची झाडे लावावीत. वरीलप्रमाणे विकासकामे तातडीने करण्यात यावी, अन्यथा या भागातील रहिवासी आंदोलन करतील, असे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर परिसरातील ५० हून अधिक रहिवाशांच्या सह्या आहेत.