प्रदूषण टाळण्यासाठी नसरापूरकरिता विद्युत शवदाहिनीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:09 AM2021-05-06T04:09:45+5:302021-05-06T04:09:45+5:30
निवेदनासोबत भोर, वेल्हा, मुळशीचे आमदार संग्राम थोपटे यांनी सदरकामी जिल्हा परिषदेने तातडीने लक्ष घालून योग्य उपाययोजना करावी, असे पत्राद्वारे ...
निवेदनासोबत भोर, वेल्हा, मुळशीचे आमदार संग्राम थोपटे यांनी सदरकामी जिल्हा परिषदेने तातडीने लक्ष घालून योग्य उपाययोजना करावी, असे पत्राद्वारे सूचित केल्याचे आवाळे यांनी सांगितले.
नसरापूर हे भोर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या नसरापूर-भोलावडे गटातील राष्ट्रीय महामार्गावरील महत्त्वाचे बाजारपेठेचे गाव आहे. येथील वाढते शहरीकरण, विकसित होत असलेले उद्योगधंद्यामुळे कात्रज घाट ते ते पुणे जिल्हा हद्दीतील सारोळे महामार्गालगतच्या गावांचे शहरीकरण वेगाने होत आहे. परिणामी उपलब्ध व्यवस्थेवर दिवसेंदिवस ताण येत आहे. त्यातून मृतदेहांचे दहन करण्यासाठी लागणाऱ्या साहित्यासाठी नातेवाइकांची यातायात होत आहे. शवदहन करण्यासाठी लागणारे सरपण, गोवऱ्या व वाढत्या शहरीकरणामुळे होत असलेले गृहप्रकल्पामुळे परिसरातील जंगलतोड मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यातून ही बाब पर्यावरणास हानिकारक ठरत असून, भविष्यकाळासाठी ही बाब म्हणजे धोक्याची घंटा ठरणार असल्याचे विठ्ठल आवाळे यांनी निवेदनाद्वारे कळविले आहे.
संभाव्य धोका टाळण्यासाठी व पर्यावरणाच्या समतोल राखण्याच्या दृष्टीने तालुक्यात नसरापूर येथे विद्युत शवदाहिनी बसविणे गरजेचे असल्याचे आवाळे यांनी नमूद केले आहे. दरम्यान यासंदर्भात जि.प.ने तातडीने उपाययोजना करावी, असे आमदार थोपटे यांनी सूचित केले असल्याने लवकरच विद्युत शवदाहिनी बसविण्याच्या प्रश्न मार्गी लागेल, असे आवाळे यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांना नसरापूर ग्रामस्थांच्यावतीने निवेदन देताना जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे, नसरापूरचे उपसरपंच गणेश दळवी व माजी सैनिक अनिल शेटे.