निवासी मिळकत कर सवलतीमध्ये मुदतवाढ करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:08 AM2021-05-28T04:08:23+5:302021-05-28T04:08:23+5:30
महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत असलेल्या मिळकत कराचा भरणा करण्याकरिता ३१ मेपर्यंत सवलतीमध्ये मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र, अद्यापही बरेच ...
महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत असलेल्या मिळकत कराचा भरणा करण्याकरिता ३१ मेपर्यंत सवलतीमध्ये मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र, अद्यापही बरेच नागरिक इच्छा असतानाही मिळकत कर भरू शकले नाहीत. गेल्या वर्षभरापासून कोरोनाची साथ, टाळेबंदी, निर्बंध अशा अनेक कारणांमुळे नागरिकांचे उत्पन्न घटले आहे. नागरिकांची कर भरण्याची इच्छा असली, तरी ते प्रत्यक्षात शक्य होत नसल्याने सध्या महापालिकेने दिलेल्या १५ टक्के सवलतीसह मुदत वाढवून मिळावी, याबाबत महापालिकेला निवेदन दिले आहे.
कोट:
सध्या ३१ मेपर्यंत मिळकत कर भरल्यास १५ टक्के सवलत महापालिकेकडून देण्यात आली आहे. कोरोना संसर्गामुळे करण्यात आलेल्या टाळेबंदीने नागरिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. महापालिकेने दिलेल्या सवलतीची मुदत वाढवून मिळावी.
- शरद दबडे
कार्याध्यक्ष : राष्ट्रवादी युवक काँग्रेस खडकवासला मतदारसंघ