भोर येथील कोविड सेंटरमध्ये सोयीसुविधा देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:09 AM2021-04-03T04:09:46+5:302021-04-03T04:09:46+5:30
भोर रामबाग येथील उपजिल्हा रुग्णालयातील कोविड सेटर येथे ३५ तर रथखाना येथील सेंटरला ५० अशी एकूण ८५ रुग्ण उपचार ...
भोर रामबाग येथील उपजिल्हा रुग्णालयातील कोविड सेटर येथे ३५ तर रथखाना येथील सेंटरला ५० अशी एकूण ८५ रुग्ण उपचार घेत आहेत. दिवसेंदिवस रुग्ण वाढत आहेत. या रुग्णांना सोयीसुविधांचा अभाव असल्याबद्दल रुग्णांच्या नातेवाईकांनी तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे दोन्ही कोविड सेंटरला गुरुवारी उपसभापती लहु शेलार यांनी भेट दिली. रुग्णांच्या उपचाराबाबत माहिती घेतली व सोयी सुविधा पुरवण्याची मागणी तहसिलदार अजित पाटील व अधीक्षक डाॅ. दत्तात्रय बामणे यांच्याकडे केली .
रामबाग येथील उपजिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांची बैठक घेऊन रुग्णांच्या उपचाराबाबत कोणत्याही तक्रार येणार नाही जेवणातही बदल करण्यात येईल. असे डॉ. बामणे यांनी सांगितले .
भोर शहरातील दोन्ही कोविड सेंटरला उपविभागीय अधिकारी यांच्या समवेत तहसिलदार अजित पाटील,गटविकास अधिकारी यांनी भेट देऊ रुग्णाच्या उपचाराच्या त्रुटीबाबत माहिती घेऊन सूचना केल्या असून सुधारणा होत करत असल्याचे तहसीलदार अजित पाटील यांनी सांगितले.