फुलांची मागणी अन् भावही घटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:10 AM2021-09-27T04:10:35+5:302021-09-27T04:10:35+5:30
पुणे : मार्केट यार्डात सद्यस्थितीत सर्व प्रकारच्या फुलांची साधारण आवक होत आहे. पितृपक्ष पंधरवड्यात विशेषकरून धार्मिक कार्यक्रम तसेच इतर ...
पुणे : मार्केट यार्डात सद्यस्थितीत सर्व प्रकारच्या फुलांची साधारण आवक होत आहे. पितृपक्ष पंधरवड्यात विशेषकरून धार्मिक कार्यक्रम तसेच इतर शुभकार्य होत नाही. त्यामुळे बाजारात फुलांची मागणी घटल्याने त्याचा परिणाम दरावर झाला आहे. फुलांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत निम्म्याने कमी झाले आहेत. जिल्ह्यासह राज्यातील मंदिरे घटस्थापनेच्या मुहूर्तावर (दि. ७) खुली होणार आहे. त्यामुळे याकाळात फुलांची आवक व मागणी वाढून दरही वाढतील, अशी शक्यता फुलांचे व्यापारी सागर भोसले यांनी व्यक्त केली आहे.
फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे :-
झेंडू : ५-२०, गुलछडी : १०-३०, शेवंती : (गड्डीचे भाव) १००- ४००, ऑष्टर : जुडी २-५, सुट्टा १०-२००, कापरी : १०-२०, गुलाबगड्डी : ५-१५, गुलछडी काडी : १०-३०, डच गुलाब (२० नग) : ३०-६०, जर्बेरा : १०-२५, कार्नेशियन : ४०- ६०, शेवंती काडी ८०-१५०, लिलियम (१० काड्या) ७००-८००, ऑर्चिड २००-३००, जुई : २००-२५०, ग्लॅडिओ (१० काड्या) : ४०-६०.