लग्न सराई व मार्गशीर्षमुळे फुलांना मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 04:07 AM2020-12-28T04:07:03+5:302020-12-28T04:07:03+5:30
पुणे: थंडीचा कडाका वाढल्यामुळे फुलांचे उत्पादन घटले आहे. याचा परिणाम आवक काही प्रमाणात घटली आहे. येत्या मंगळवारी (दि.२९) दत्त ...
पुणे: थंडीचा कडाका वाढल्यामुळे फुलांचे उत्पादन घटले आहे. याचा परिणाम आवक काही प्रमाणात घटली आहे.
येत्या मंगळवारी (दि.२९) दत्त जयंती आहे.त्यात लग्न सराई आणि मार्गशीर्ष महिन्यामुळे फुलांची मागणी वाढली आहे, असे सागर भोसले यांनी सांगितले.
सर्व प्रकारच्या फुलांचे दर मागील आठवड्याच्या तुलनेत टिकून आहेत. लग्नसराईत सुरू असल्यामुळे आणि दत्त जयंती यामुळे शोभिवंत फुलांना मागणी जास्त आहे. झेंडूलाही नेहमीच्या तुलनेत अधिक मागणी आहे. मात्र, दत जयंतीचा विचार केल्यास नेहमीच्या तुलनेत मागणी नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. दर देखील चांगली वाढ झाली आहे. मात्र, अपेक्षित प्रमाणात वाढलेले नसल्याचेही व्यापाऱ्यांनी स्पष्ट केले.
फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : २०-३०, गुलछडी : १५०-२००, ऑस्टर : जुडी १०-१६, कापरी : ३०-५०, शेवंती : १००-१५०, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : ३०-५०, गुलछडी काडी : ३०-८०, डच गुलाब (२० नग) : १००-२००, जर्बेरा : ४०-७०, कार्नेशियन : १२०-२००, शेवंती १००-१५०.