बंद अवस्थेतील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प तात्काळ सुरु करण्याची मागणी

By नितीश गोवंडे | Updated: January 9, 2025 21:07 IST2025-01-09T21:05:26+5:302025-01-09T21:07:19+5:30

ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे कोराना काळात आणीबाणीची परिस्थिती अनुभवल्यानंतर पुणे महापालिकेसह जिल्ह्यातील विविध रुग्णालयात एकूण ६० प्रकल्प उभारण्यात आले होते. मात्र,

Demand for immediate start of closed oxygen production project | बंद अवस्थेतील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प तात्काळ सुरु करण्याची मागणी

बंद अवस्थेतील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प तात्काळ सुरु करण्याची मागणी

पुणे : कोरोना व्हायरस नंतर जग आता नवीन एचएमपीव्ही व्हायरस च्या संकट छायेत आहे. चीन मधून आलेल्या ह्या व्हायरसचे भारतातही आतापर्यंत सात बाधित रुग्ण सापडले असून बाधित रुग्णांची संख्या वाढण्याची भीती आरोग्य तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे कोराना काळात आणीबाणीची परिस्थिती अनुभवल्यानंतर पुणे महापालिकेसह जिल्ह्यातील विविध रुग्णालयात एकूण ६० प्रकल्प उभारण्यात आले होते. मात्र, यातील १९ प्रकल्प सद्यस्थितीत बंद आहेत.

हे बंद असलेले ऑक्सिजन प्रकल्प एचएमपीव्ही व्हायरस चे संकट ओळखून तात्काळ सुरु करण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे-पाटील यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांच्याकडे देण्यात आले. यावेळी पुणे शहर व जिल्हा विद्यार्थी काँग्रेस सरचिटणीस कृष्णा साठे, ज्ञानेश्वर जाधव हे उपस्थित होते. महापालिका, रेल्वे रुग्णालय आणि ससून रुग्णालयामध्ये एकूण अठरा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात आले होते. त्यापैकी सध्या तेरा प्रकल्प सुरु असून, बंद असलेले सात प्रकल्प पुन्हा सुरु करण्याची मागणीही महापालिका आयुक्तांकडे सुरवसे पाटील यांनी केली आहे.

 

एचएमपीव्ही व्हायरसचा संभाव्य धोका ओळखून सरकारने व प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. बंद अवस्थेतील ऑक्सिजन प्रकल्प तात्काळ सुरु होणे गरजेचे आहे. - रोहन सुरवसे-पाटील, सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस

 

Web Title: Demand for immediate start of closed oxygen production project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.