पुणे : आंब्याला मागणी वाढली; इतर फळांची मागणी घटली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2022 08:07 AM2022-05-23T08:07:41+5:302022-05-23T08:09:34+5:30
बाजारात लिंबाची आवक वाढली...
पुणे : आंब्याचा सिझन असल्याने नागरिक सध्या आंबे खरेदी करत आहे. परिणामी, अन्य फळांची मागणी घटली आहे. वाढत्या उष्णतेमुळे पाण्याचा तुटवडा निर्माण झाल्याने त्याचा परिणाम फळांच्या प्रतवारीवर झाला आहे. बाजारात जवळपास निम्म्याहून अधिक फळांमध्ये पाण्याचे प्रमाण कमी असल्याने प्रतवारी खूपच खालावली आहे. बाजारात लिंबाची आवक वाढली आहे. कच्चा व हिरव्या लिंबाचे प्रमाण जास्त असल्याने भावात १५ किलोच्या गोणीमागे दोनशे रुपयांनी घट झाली आहे.
रविवारी (दि.२२) मार्केटयार्ड येथील फळबाजारात केरळ येथून अननस ६ ट्रक, संत्री १ ते २ टन, मोसंबी ३० ते ४० टन, डाळिंब ३० ते ३२ टन, पपई १० ते १५ टेम्पो, लिंबे सुमारे १,५०० ते २,००० गोणी, पेरू ५० ते १०० क्रेट्स, कलिंगड ४० ते ५० गाड्या, खरबूज १५ ते २० गाड्या, अंजीर १ टन, तर रत्नागिरी हापूस पाच ते सहा हजार पेटी आवक झाली.
फळांचे भाव पुढीलप्रमाणे :
लिंबे (प्रति गोणी) : ५००-१,०००, मोसंबी : (३ डझन) : २५०-४००, (४ डझन) : १०० ते २४०, संत्रा : (१० किलो) : ५००-७५०, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : ४०-१५०, गणेश : १०-४०,आरक्ता २०-८०. कलिंगड : ३-७, खरबूज : १०-१२, पपई : ७-१२, पेरू (२० किलो) : १००-२००, चिक्कू (१० किलो) : १००-४००, अंजीर : ३०-1१३०, रत्नागिरी हापूस (३ ते ८ डझन) (कच्चा) : ८००-१,५००, (तयार) : १,२०० ते २,०००. कर्नाटक आंबा : हापूस (४ ते ५ डझन) ८००-१,५००, पायरी (४ ते ५ डझन) ४००-७००, लालबाग (१ किलो) २०-४०, बदाम (१ किलो) : २५-४०.