पीएमआरडीच्या घरकुलांना निधी देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:13 AM2021-02-26T04:13:36+5:302021-02-26T04:13:36+5:30
यावेळी वेल्हे तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज शेंडकर, उपाध्यक्ष गणेश जागडे, वकील नितीन दसवडकर, सुभाष खुटवड, ...
यावेळी वेल्हे तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज शेंडकर, उपाध्यक्ष गणेश जागडे, वकील नितीन दसवडकर, सुभाष खुटवड, दीपक धुमाळ, संतोष लिम्हण आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.
दिलेल्या निवेदनात असे म्हंटले आहे की, वेल्हे तालुक्यातील पीएमआरडीची हद्द दापोडे या गावापर्यंत आहे. येथील घरकुलांना मंजुरी मिळून बरेच महिने झाले. तरीदेखील येथील लाभार्थ्यांच्या खात्यावर निधी मिळालेला नाही. परिणामी, लाभार्थ्यांना आपलं घर बांधता येईना. मंजूर झालेल्या लाभार्थ्यांची घरे अत्यंत बिकट परिस्थितीत आहेत. या वर्षी त्यांनी घरकुल बांधले नाहीतर त्यांचा राहण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे पीएमआरडीच्या अधिकाऱ्यांनी ताबडतोब लाभार्थ्यांच्या खात्यावर निधी वितरित करावा ,अन्यथा कायदेशीर मार्गाने वेल्हे युवक काँग्रेसच्या माध्यमातून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल. तसेच, पीएमआरडीची हद्द दापोडे या गावापर्यंत आहे. या गावापर्यंत पीएमपीएलची बससेवा सुरू करावी अशी देखील मागणी पीएमपीएल अधिकाऱ्यांकडे करण्यात आली पीएमआरडीच्या घरकुल लाभार्थ्यांना लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यावर निधी जमा होईल, असे आयुक्त सुहास दिवटे यांनी यावेळी सांगितले .
२५ मार्गासनी
पीएमआरडीचे आयुक्त
कार्यालय औंध सुहास दिवटे यांना देताना वेल्हे युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज शेंडकर, उपाध्यक्ष गणेश जागडे.