खोरच्या राखडलेल्या विकासकामांसाठी निधीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:17 AM2021-02-17T04:17:00+5:302021-02-17T04:17:00+5:30

--- खोर : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या खोर (ता. दौंड) भागामधील विविध विकासकामांच्या बाबतीत पाठपुरावा सुरु केलेला असून याबाबत ...

Demand for funds for the development of the creek | खोरच्या राखडलेल्या विकासकामांसाठी निधीची मागणी

खोरच्या राखडलेल्या विकासकामांसाठी निधीची मागणी

Next

---

खोर : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या खोर (ता. दौंड) भागामधील विविध विकासकामांच्या बाबतीत पाठपुरावा सुरु केलेला असून याबाबत आमदार राहुल कुल यांना देखील या कामांसाठी निधीच्या मागणीबाबत निवेदन दिल्याची माहिती खोरचे उपसरपंच पोपट चौधरी यांनी सांगितले.

खोरगावठान व खिंडीचीवाडी येथील उद्यान निर्मिती, खोर पेयजल योजना सुव्यवस्थापन, फरतडे-लवांडे वस्ती रस्ता, इजुळा रस्ता, हरीबाचीवाडी रस्ता, खडाकवस्ती रस्ता, खोर ग्रामपंचायत कार्यालय ते गावठान रस्ता व ओढ्यावरील पूल बांंधणे, उर्वरित दफनभूमी व स्मशानभूमी सुशोभीकरण, सुसज्ज व्यायामशाळा, राहिलेल्या ठिकाणी वाड्यावस्त्यावरील स्मशानभूमी, नवीन तलाव व बंधारे निर्मिती, खोर प्राथमिक आरोग्य केंद्र सुव्यवस्थापन, पाटीलवाड़ी व शेराचीवाडी रस्ते हे कामे आजपर्यंत रेंगाळली गेली. यासाठी दहा कोटी रुपयांची आवश्यकता आहे.

याबाबत पाठपुरावा करून ही कामे मार्गी लावण्यात येणार आहे. खोर गावाचा सर्वात महत्त्वपूर्ण विषय हा पाण्याचा असून या बाबतीतील पद्मावती तलाव व फरतडेवस्ती तलावात वर्षातून किमान दोन आवर्तने जानाई-शिरसाई योजनेतून मिळण्यासाठी कटिबध्द राहणार आहे. खोरच्या डोंबेवाड़ी पाझर तलावत पुरंदर जलसिंचन उपसा योजनेचे पाणी मिळावे म्हणून आजपर्यंतचे प्रयत्न सुरु आहेत. बंदिस्त लाईन पाणी योजना जवळपास ४ कोटी रुपये योजना ही फाइल मंत्रालयमध्ये मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.

Web Title: Demand for funds for the development of the creek

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.