उमाजी नाईक स्मारकासाठी निधीची तरतूद करण्याची मागणी
By admin | Published: June 28, 2017 03:57 AM2017-06-28T03:57:40+5:302017-06-28T03:57:40+5:30
आद्य क्रांतिवीर उमाजीराजे नाईक यांचे राष्ट्रीय स्मारक उभे करण्यासाठी शासकीय निधीची भरीव तरतूद करावी, अशी मागणी अखिल
लोकमत न्यूज नेटवर्क
बारामती : आद्य क्रांतिवीर उमाजीराजे नाईक यांचे राष्ट्रीय स्मारक उभे करण्यासाठी शासकीय निधीची भरीव तरतूद करावी, अशी मागणी अखिल महाराष्ट्र बेरड, बेडर रामोशी समाज कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे.
इंग्रजांच्या विरोधात सशस्त्र क्रांतीचे पहिले बंड पुकारणारे देशाचे आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची २२५ वी जयंती ७ सप्टेंबर २०१६ रोजी समाजाच्या वतीने राजभवन भिवडी स्मारक (ता. पुरंदर) येथे साजरी करण्यात आली. परंतु या राष्ट्रपुरु षाचा आणि या समाजाचाही शासनाला अजूनही विसर पडला आहे. आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या महान कार्याबाबत अनेक वर्षे शासन दरबारी वेळोवेळी निवेदन देऊनही दखल घेतली जात नाही.
उमाजी नाईक यांची जयंती सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयाने साजरी करावी. त्यांचे छायाचित्र सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयात उपलब्ध करून देण्याबाबत परिपत्रक काढावे. त्यांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्यासाठी शासकीय निधीची भरीव तरतूद करावी. राज्यातील इदाते समिती १९९९ च्या अहवालानुसार रामोशी समाजातील ७५ टक्के लोक भूमिहीन आहेत. त्यामुळे समाजाच्या उन्नतीसाठी स्वतंत्र आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे, या मागण्या कृती समितीच्या वतीने करण्यात आल्या आहेत.
कृती समितीचे जिल्हा संपर्कप्रमुख नानासाहेब मदने, ज्ञानेश्वर भंडलकर,
बाळासोा जाधव, विकास भंडलकर, भागवत भंडलकर, सचिन खोमणे, अक्षय भंडलकर, सोमनाथ खोमणे, प्रशांत मदने, संदीप मदने, हनुमंत भंडलकर, मुकेश खोमणे, सचिन मदने, सुनील जाधव, महेश मदने, रवींद्र जाधव, सुनील जाधव, अप्पा भंडलकर आदींनी हे निवेदन दिले आहे.