दौंड वैद्यकीय उपअधीक्षकांच्या चौकशीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:08 AM2021-06-26T04:08:37+5:302021-06-26T04:08:37+5:30

दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांनाच कोरोना प्रतिबंधक लस देण्याची कोणतीही लेखी सूचना नसतानाही ...

Demand for inquiry of Daund Medical Deputy Superintendent | दौंड वैद्यकीय उपअधीक्षकांच्या चौकशीची मागणी

दौंड वैद्यकीय उपअधीक्षकांच्या चौकशीची मागणी

Next

दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांनाच कोरोना प्रतिबंधक लस देण्याची कोणतीही लेखी सूचना नसतानाही ४४ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना दोन तास रांगेत थांबवून त्यांची नोंदणी केली. आणि त्यानंतर वय जास्त असल्याचे कारण सांगत लस देता येणार नसल्याचे सांगितले. हा सगळा प्रकार धक्कादायक आहे. रेमडेसिविर इंजेक्शनदेखील व्यक्तिगत हितसंबंध असणाऱ्या नागरिकांना देण्यात आले आहे. कोरोनावर गुणकारी असणाऱ्या गोळ्यांची किंमत बाजारामध्ये हजार-दोन हजारांच्या पुढे आहेत. त्यामुळे अशा गोळ्या गोरगरिबांना उपलब्ध करुन दिल्या जात नाही. मध्यंतरी कोरोना लसीचा साठा केवळ अपंगांसाठीच होता. त्यांचेच लसीकरण सुरु असल्याचे सांगितले जात होते. मात्र, त्या काळातही काही राजकीय व्यक्तींना लसी पुरवल्या जात होत्या. त्यामुळे या सर्व प्रकाराची चौकशी करावी, असे या निवेदनात म्हटले आहे.

या वेळी अजिंक्य गायकवाड, राहुल नायडू, अक्षय शिखरे, शिवा खारारे, अक्षय हाडमोडे, उमेश नडगमकर, अक्षय जाधव, हमीद शेख आणि मान्यवर उपस्थित होते.

२५ दौंड

Web Title: Demand for inquiry of Daund Medical Deputy Superintendent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.