पेट्रोलसाठी कर्ज देण्याची केंद्राकडे मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:16 AM2021-02-06T04:16:36+5:302021-02-06T04:16:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी झाल्याचा फायदा सर्व देशांनी पेट्रोलचे दर कमी करून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी झाल्याचा फायदा सर्व देशांनी पेट्रोलचे दर कमी करून नागरिकांना दिला. केंद्र सरकार मात्र पेट्रोलचे दर वाढवतच चालले असून त्यांनी नागरिकांना आता पेट्रोल खरेदीसाठी कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करत आम आदमी (आप) पार्टीने बालगंधर्व चौकात गुरुवारी (दि. ४) दुपारी आंदोलन केले.
‘आप’चे शहराध्यक्ष मुकुंद किर्दत म्हणाले की केंद्र सरकार पेट्रोल, डिझेल कर वेगवेगळे अधिभार लावून पैसा जमा करत आहे. दिल्लीत आप सरकारने पेट्रोल ८६ रुपये ३० पैसे प्रतिलिटर ठेवले आहे. महाराष्ट्रात ते ६ रुपये १० पैशांनी जास्त आहे, कारण राज्य सरकारने त्यावर वेगळा वॅट कर लावला आहे. राज्य सरकारने तो कमी करावा.
आपच्या आंदोलनात संदीप सोनवणे, सैद अली, अभिजित मोरे, मनोज थोरात, नागनाथ गायकवाड, बाळू वाघमारे, विकास लोंढे, अमोल अडागळे, सर्फराज शेख, हरून शेख, अशोक धुमाळ, मोईन चौधरी, जमील सय्यद, ज्ञानेश्वर गायकवाड आदी सहभागी झाले होते.