बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:37 AM2020-12-17T04:37:59+5:302020-12-17T04:37:59+5:30
मागील काही वर्षांपासून आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे पडवळ, नारोडी,चास,कळंब,चांडोली, पिंपळगाव,खडकी,निरगुडसर,अवसरी,पारगाव,काठापूर,पोंदेवाडी, वडगाव काशिंबेग,सुलतानपूर,मंचर व अन्य काही भागात बिबट्याच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांच्या ...
मागील काही वर्षांपासून आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे पडवळ, नारोडी,चास,कळंब,चांडोली, पिंपळगाव,खडकी,निरगुडसर,अवसरी,पारगाव,काठापूर,पोंदेवाडी, वडगाव काशिंबेग,सुलतानपूर,मंचर व अन्य काही भागात बिबट्याच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांच्या पशुधनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन शेतकरी आर्थिक संकटात सापडत आहेत.त्यातच काही परिसरात बिबट्या आता मानवावरही मोठ्याप्रमाणावर हल्ले करत असल्यामुळे शेतकरी,नागरिक हे बिबट्याच्या भयाखाली जगत असल्याचे दिसत आहेत. वनविभागाच्या वतीने नागरिकांना योग्य असा न्याय मिळत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.मागील काही महिन्यांपासून बिबट्याच्या हल्ल्यात मृत झालेल्या जनावरांना मिळणारी आर्थिक मदत सुद्धा शेतकऱ्याला मिळाली नसल्याने याबाबत वनविभाग व नागरिक यांच्यात कधीकधी वाद होत असल्याचे निदर्शनास येत आहे.याबाबत राज्यस्तरावर आपण वनखात्याची बैठक घेऊन तालुक्यात मोठ्या प्रमाणावर बिबट्याचा प्रादुर्भाव असणाऱ्या गावात ठिकठिकाणी हायमॅक्स दिवे लावून व वनविभागाला योग्य त्या सूचना देऊन नागरिकांचे भय कमी करण्याचा प्रयत्न करावा अशी मागणी जिल्हा परिषद सदस्या तुलसी सचिन भोर यांनी केली आहे.