सर्व दुकाने सुरू ठेवण्यासाठी मंचर व्यापारी महासंघाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:09 AM2021-04-10T04:09:51+5:302021-04-10T04:09:51+5:30
दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, ब्रेक द चेन अंतर्गत शासन आदेशानुसार काही व्यापारी क्षेत्रावर परिणाम होत आहे. ...
दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, ब्रेक द चेन अंतर्गत शासन आदेशानुसार काही व्यापारी क्षेत्रावर परिणाम होत आहे. अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता बाजारपेठेत इतरही आस्थापना आहेत. त्यांनी व्यवसाय सुरू करण्यासाठी वित्तीय संस्थांची कर्जे काढली आहेत. गेले वर्षभर कोविडचा सामना करताना या क्षेत्रातील अनेकांना व्यवसाय बंद करावे लागले आहेत. अत्यावश्यक सेवांच्या वेळेप्रमाणेच इतर आस्थापना सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी. राज्य शासनाच्या आदेशानुसार मंचर शहरातील बहुतांशी व्यापाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरण करुन घेतले आहे. ज्यांचे लसीकरण करावयाचे राहिले असल्यास ते करून घेण्यास व्यापारी महासंघ तयार आहे. त्यासाठी शासनाने वयाची कोणतीही अट न ठेवता व्यापारी आणि कामगार बाधवांना लस उपलब्ध करून द्यावी. राज्य शासनाच्या धोरणाप्रमाणे अर्थचक्र सुरळीत ठेवण्यासाठी मंचर शहरातील सर्व आस्थापना सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी मिळावी असे म्हटले आहे.
०९ मंचर
व्यापारी महासंघाच्या वतीने पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांना निवेदन देण्यात आले.