मुंबई विद्यापीठाला संभाजी महाराजांचे नाव देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2018 08:29 PM2018-05-02T20:29:39+5:302018-05-02T20:29:39+5:30
छत्रपती संभाजी महाराजांचा साहित्यिक, संस्कृत पंडित तसेच रयतेला समतेचा, स्वातंत्र्याचा व न्यायाचा मार्ग दाखविणारे समाजसुधारक शिक्षक म्हणून गाैरव हाेणे अावश्यक असल्याने त्यांचे नाव मुंबई विद्यापीठाला देण्याची मागणी सकल मराठी समाजाकडून करण्यात अाली अाहे.
पुणे : छत्रपती संभाजी महाराजांचे नाव मुंबई विद्यापीठाला देण्यात यावे अशी मागणी सकल मराठी समाजाच्यावतीने करण्यात अाली अाहे. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु, राज्यपाल, मुख्यमंत्री यांना याबाबतची मागणी करण्यात अाली असून त्याचे निवेदन पुणे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात अाले अाहे. साहित्यिक, संस्कृत पंडित, 14 भाषा अवगत असणारा तसेच रयतेला समतेचा, स्वातंत्र्याचा व न्यायाचा मार्ग दाखविणारे समाजसुधारक शिक्षक म्हणूनही संभाजी महाराजांचा गाैरव हाेणे अावश्यक असल्याने विद्यापीठाला संभाजी महाराजांचे नावे देण्यात यावे असे पत्रात नमूद करण्यात आले अाहे.
18 जुलै 1857 साली मुंबई विद्यापीठाची स्थापना मिशनरी जाॅन विल्सन यांनी केली. मुंबई विद्यापीठाचा रंग भगवा आहे, मुंबई विद्यापीठ हे अार्थिक विद्यापीठ आहेच, परंतु विद्यापीठात भारतीयांबराेबर परदेशी विद्यार्थी देखील शिक्षणासाठी येत असतात. त्याकाळी शिक्षण बंदी असताना भाेजपुरी, मराठी, हिंदी, संस्कृत, माेडी, कन्नडी, तामिळ असे बहुभाषिक साहित्य अापल्या विचार काैशल्यावर संस्कृत पंडित छत्रपती संभाजी महाराज यांनी निर्माण केले अाहे. खऱ्या अर्थाने साहित्य, कला व शिक्षण यांच्या जाेरावर माणसाला असाध्य ते साध्य करण्याची शक्ती मिळू शकते हे साडेतीनशे वर्षापूर्वी शंभूराज्यांनी त्यांच्या कृतीतून सिद्ध केले. त्यांच्या बुधभूषण, सातशतक, नखशिकांत, नायिकाभेद अशी उच्च काेटीची मानवी मुल्य व विचार संपदा निर्माण करुन मानवाला विचार बंधनातून मुक्तीचा मार्ग माेकळा केला आहे. छत्रपती संभाजी राजेंच्या स्वराज्य रक्षण पराक्रम, मुत्सदेगिरी यावर बहुतांश प्रकाश पडलेला अाहे. परंतु साहित्यिक, संस्कृत पंडित व रयतेला समतेचा, स्वातंत्र्याचा व न्यायाचा मार्ग दाखविणारे समाजसुधारक शिक्षक म्हणूनही संभाजी महाराजांचा गाैरव हाेणे अावश्यक आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठाला संभाजी महाराजांचे नाव द्यावे असे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात अाले अाहे.