नानगाव महिला बचत गटाच्या सेना च्या गोवरींना तेलंगणा राज्यातून मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:11 AM2021-04-24T04:11:20+5:302021-04-24T04:11:20+5:30

दोन महिन्यांपूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद सदस्या राणी शेळके यांनी गावातील महिलांसाठी बचत गटातून रोजगार निर्मिती ...

Demand from Nangaon Mahila Bachat Group for Telangana | नानगाव महिला बचत गटाच्या सेना च्या गोवरींना तेलंगणा राज्यातून मागणी

नानगाव महिला बचत गटाच्या सेना च्या गोवरींना तेलंगणा राज्यातून मागणी

Next

दोन महिन्यांपूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद सदस्या राणी शेळके यांनी गावातील महिलांसाठी बचत गटातून रोजगार निर्मिती कशी करायची या संदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या सूचनेवरून शिबिराचे आयोजन केले होते.यावेळी जिल्हा परिषदेच्या सोनाली मॅडम यांनी महिलांना मार्गदर्शन केले.

गावातील दौंड तालुका

राष्ट्रवादी काँग्रेस युवती कार्याध्यक्ष आश्लेषा नंदकिशोर शेलार यांनी महिला बचत गटातील प्रत्येक महिलेला रोजगार मिळावा यासाठी २ महिन्यांपूर्वी त्यांना स्वतः च्या गावातून महिला बचत गटाला गायीच्या शेणाची गोवरी बनवावयाचे ठरवले. तो व्यवसाय यशस्वी ठरला. आता महिला बचत गटातील सर्व महिला व्यवसायातून उत्पन्न कमावणार आहेत. शेणाची गौरी चांगल्या किंमतीला अमेझॉन वर विक्री झाली आहे.प्रथमच मागणी ही तेलंगाना राज्यातून ग्राहकाने केली आहे. त्यास किंमत ही चांगली मिळाली आहे. प्रथम मागणीचे कुरियर हे केडगाव पोस्ट ऑफिस मधून केडगाव वरून तेलंगाना पार्सल हे केले . एका गोवरीची किंमत दहा रुपये आहे. धार्मिक विधी साठी परराज्यात गोवरींना मोठी मागणी असते.

यावेळी आश्लेषा नंदकिशोर शेलार, महिला बचत गटाच्या तालुकाध्यक्ष निर्जला गुंड ,कविता मोटे आदी पदाधिकारी उपस्थित होते. यासंदर्भात जिल्हा परिषद सदस्या राणी शेळके म्हणाल्या की, महिला बचत गट अनेक पदार्थ तयार करतात परंतु त्यांना विक्रीसाठी व्यासपीठ नसते. दोन महिन्यापूर्वी ॲमेझॉन वर बचत गटाने केलेल्या पदार्थांची विक्री कशी करण्यासंदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद मार्गदर्शन केले. नांनगाव येथील महिला बचत गटाला विक्रीसाठी ॲमेझॉन हे व्यासपीठ मिळाले. भविष्यामध्ये जिल्हा स्तरावर हा उपक्रम राबवायचा आहे.

--

फोटो क्रमांक :२३केडगाव ॲमेझोऍन गौरी

फोटो ओळी-बचत गटाने शेणापासून तयार केलेल्या गोवरीचे तेलंगणा राज्यामध्ये निर्यात करताना आश्लेशा शेलार व महिला प्रतिनिधी.

Web Title: Demand from Nangaon Mahila Bachat Group for Telangana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.