जिरायती पट्टयातील दोन उमेदवारांना संधी मिळण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:13 AM2021-09-24T04:13:05+5:302021-09-24T04:13:05+5:30
सुपे : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची रखडलेली निवडणूक प्रक्रिया नुकतीच सुरू झाली आहे. त्यामुळे सुपे परिसरातील जिरायती पट्टयातील ...
सुपे : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची रखडलेली निवडणूक प्रक्रिया नुकतीच सुरू झाली आहे. त्यामुळे सुपे परिसरातील जिरायती पट्टयातील किमान दोन उमेदवारांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलमधून संधी मिळण्याची मागणी सभासद शेतकऱ्यांनी केली आहे. मात्र, स्वीकृत संचालक घेऊन बोळवण करू नये, असा सूर शेतकरी, सभासद वर्गातून येत आहे.
या जिरायती भागातील सुमारे २ हजार ३५० मतदार सभासद आहेत. मागील पंचवार्षिक निवडणुकीत याच जिरायती भागातील सभासद शेतकऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे पॅनल निवडून आणण्यात महत्त्वाचा वाटा उचलला होता. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाने स्वीकृत संचालक घेऊन बोळवण करू नये, असा सूर शेतकरी सभासद वर्गातून येत आहे.
त्यामुळे सुपे परिसरातील राष्ट्रवादीतील इच्छुक व पक्षाशी एकनिष्ठ असलेले कार्यकर्ते तयारीला लागले आहेत. त्यामुळे बारामतीच्या जिरायती पट्टयातील कार्यकर्त्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.