सोपानदेव महाराजांच्या पालखी सोहळ्याला परवानगी देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:09 AM2021-06-04T04:09:19+5:302021-06-04T04:09:19+5:30

पुणे येथे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील प्रमुख देवस्थानच्या विश्वस्तांची बैठक पार पडली होती. यामध्ये सासवड येथील संत ...

Demand for permission for Sopandev Maharaj's Palkhi ceremony | सोपानदेव महाराजांच्या पालखी सोहळ्याला परवानगी देण्याची मागणी

सोपानदेव महाराजांच्या पालखी सोहळ्याला परवानगी देण्याची मागणी

Next

पुणे येथे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील प्रमुख देवस्थानच्या विश्वस्तांची बैठक पार पडली होती. यामध्ये सासवड येथील संत सोपानदेव महाराज पालखी सोहळ्याचे विश्वस्त हभप त्रिगूण महाराज गोसावी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यासंदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्रिगूण गोसावी यांनी माहिती दिली.

त्रिगूण गोसावी म्हणाले की, शासनाकडे आम्ही ५०० वारकऱ्यांची परवानगी मागितली आहे. परंतु, शासनाने किमान २०० किंवा अगदी १०० लोकांच्या उपस्थितीत सोहळा घेण्यास परवानगी दिली, तरी तेवढ्याच उपस्थितीमध्ये सोहळा सर्व नियमांचे पालन करून पार पाडण्यास आम्ही तयार असल्याचे सांगितले आहे. नागरिकांना देवस्थान याबाबत स्वतःहून माहिती देईल, गावोगावी नागरिकांना दुरूनच दर्शन असेल. मुक्कामाच्या ठिकाणी केवळ शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये महापूजा केली जाईल. मोजकेच टाळकरी, देवस्थानचे मानकरी सोहळ्यात सहभागी होतील. त्यामुळे शासनाने या सर्व परिस्थितीचा विचार करावा असेही त्यांनी यावेळी सांगितले. .

०३ सासवड

Web Title: Demand for permission for Sopandev Maharaj's Palkhi ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.