नेट परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:10 AM2021-04-18T04:10:28+5:302021-04-18T04:10:28+5:30
देशभरातील लाखो उमेदवार ऑनलाइन पद्धतीने ही परीक्षा देणार आहेत. येत्या २ ते १७ मे या कालावधीत ही परीक्षा घेण्यात ...
देशभरातील लाखो उमेदवार ऑनलाइन पद्धतीने ही परीक्षा देणार आहेत. येत्या २ ते १७ मे या कालावधीत ही परीक्षा घेण्यात येणार आहे. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने महाराष्ट्रासह अनेक राज्याने कठोर निर्बंध घातले आहेत. कोरोनाची साखळी रोखण्यासाठी सर्व प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे राज्य शासनाने एमपीएससी, वैद्यकीय परीक्षा आणि दहावी, बारावी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. त्याचप्रमाणे सीबीएसईने बारावीच्या आणि नीट ही वैद्यकीय अभ्यासक्रमाची परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. त्यामुळे नेट परीक्षासुद्धा पुढे ढकलावी, अशी मागणी केली जात आहे.
-------
कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्य शासनाने निर्बंध लादले आहेत. या परिस्थितीत उमेदवारांना परीक्षा देणे शक्य होणार नाही. त्यामुळे नेट परीक्षा पुढे ढकलावी.
- कमलाकर शेटे, उपाध्यक्ष
युक्रांद, पुणे शहर