बाधित मिळकतदारांना निधी तरतुदीची पुणे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 02:01 PM2018-01-20T14:01:04+5:302018-01-20T14:04:00+5:30
चांदणी चौकातील उड्डाणपुलामुळे बाधित होणाऱ्यांना योग्य तो मोबदला द्यावा, त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी नगरसेविका अल्पना वरपे यांनी महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे केली आहे.
कर्वेनगर : चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे केवळ उद्घाटन झाले आहे. परंतु, त्याबाबतचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. पुलामुळे बाधित होणाऱ्यांना योग्य तो मोबदला द्यावा, त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी नगरसेविका अल्पना वरपे यांनी महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे केली आहे.
चांदणी चौकातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी बहुमजली उड्डाणपुलाचे काम लवकरच सुरू करावे, त्यासाठी आवश्यक तरतूद करून जागा ताब्यात घेण्यात यावी. तसेच बाधित जागामालकांना त्वरित निधीची तरतूद करावी अशी मागणी प्रभाग १० मधील चारही नगरसेवकांनी केली आहे.
स्थायी समिती सदस्य मुरलीधर मोहोळ म्हणाले, की जागेच्या मोबदल्यात आवश्यक रक्कम वर्गीकरण निधीमधून बाधितांना देण्यात येईल.