कोंढापुरी तलावात पाणी सोडण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:14 AM2021-04-30T04:14:09+5:302021-04-30T04:14:09+5:30

माजी सरपंच स्वप्निल गायकवाड, सरपंच संदीप डोमाळे, ग्रामपंचायत सदस्य सुनील गायकवाड, राहुल दिघे, संतोष गायकवाड, माजी ...

Demand for release of water in Kondhapuri lake | कोंढापुरी तलावात पाणी सोडण्याची मागणी

कोंढापुरी तलावात पाणी सोडण्याची मागणी

Next

माजी सरपंच स्वप्निल गायकवाड, सरपंच संदीप डोमाळे, ग्रामपंचायत सदस्य सुनील गायकवाड, राहुल दिघे, संतोष गायकवाड, माजी ग्रामपंचायत सदस्य अमर गायकवाड ग्रामसेवक गंगाधर देशमुख,वि. का.संस्थेचे अध्यक्ष हिरामण गायकवाड आदींनी प्रत्यक्ष तलावावर जाऊन पाहणी केली आहे.

कोंढापुरी मध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून तलावामधील पाणीसाठा तळाला गेला असून अनेक वर्षापासून न जाणवलेला भीषण दुष्काळाचे चटके कोंढापुरी व इतर पंचक्रोशीतील या तलावावर अवलंबून असणाऱ्या गावांना जाणवू लागले आहेत. गेल्या वर्षी मुबलक प्रमाणात पाऊस झालेला असून तसेच चासकमान धरणामध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध असताना देखील मागील आवर्तनामध्ये कमी प्रमाणात पाणी सोडण्यात आले होते. तलावामध्ये गेले पंधरा दिवसांपासून पाणीसाठा संपण्याच्या मार्गावर असून जॅकवेल उघडे पडण्याची स्थिती निर्माण झाली आहे.गेल्या वर्षांमध्ये कोरोना प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे शेतमालाला मिळत असलेला निचांकी बाजार भाव व त्यातच पाण्याअभावी पिके जळू लागण्याची चिन्हे दिसू लागल्याने शेतकरीवर्ग मेटाकुटीला आला आहे. पाणीटंचाई मुळे कोंढापुरी मध्ये काही दिवसापासून नागरिकांना दिवसाआड पाणी सोडले जाते.

कोंढापुरी येथे अद्ययावत ३०० बेडचे कोविड सेंटर असून तेथेही पाण्याची टंचाई भासणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. तसेच पिण्यासाठी कोंढापुरी तलावावर अवलंबून असलेल्या कोंढापुरी, रांजणगाव गणपती, शिक्रापूर,खंडाळे, गणेगाव या पाणी पुरवठा योजना येत्या एक दोन दिवसांमध्ये पाण्याअभावी पूर्णपणेबंद होणार असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे तलावामध्ये पाणी सोडण्याची मागणी ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली आहे .

Web Title: Demand for release of water in Kondhapuri lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.