गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:20 AM2021-03-13T04:20:24+5:302021-03-13T04:20:24+5:30
गायरान जमिनीवरील बांधलेले गाळे भाड्याने देऊन जोरदार कमाईदेखील केली जात आहे. वाढणाऱ्या अतिक्रमणाचा ठपका ग्रामपंचायतीवर ठेवला जात असला तरी ...
गायरान जमिनीवरील बांधलेले गाळे भाड्याने देऊन जोरदार कमाईदेखील केली जात आहे. वाढणाऱ्या अतिक्रमणाचा ठपका ग्रामपंचायतीवर ठेवला जात असला तरी नव्याने होणारे अतिक्रमण काढण्याचे प्रयत्न ग्रामपंचायत करीत नाही हे विशेष. ग्रामपंचायतीमध्ये अनेक नागरिकांनी तोंडी वारंवार सांगूनही अतिक्रमण काढले जात नाही. मात्र अतिक्रमण करणारे व ग्रामपंचायत सदस्य यांच्यामध्ये हितगुजचे संबंध असल्याने अतिक्रमण काढले जात नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.
येलवाडी गावामध्ये गायरान जमीन ही तळेगाव-चाकण महामार्गाला लागून असलेली लाखो रुपये किमतीची मोक्याची जागा काही लोक स्वतः मालकीची असलेची बनावट दाखवून आर्थिक स्वरुपात रक्कम घेऊन लोकांची फसवणूक करत आहेत. गट नं. ३००, ४६१ या गटांमध्ये दोन वर्षांपासून जवळजवळ अनेक घरांची कच्ची अथवा पक्के बांधकाम झालेले आहे. कुठल्याही प्रकारची प्रशासकीय परवानगी न घेता अतिक्रमण केलेले आहे. ग्रामसेवक, तलाठी, सरपंच व उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य यांना वारंवार ग्रामस्थांनी तोंडी सांगूनसुद्धा ग्रामपंचायत आणि प्रशासन या अतिक्रणाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे असे दिसून येत आहे व आजही गायरानात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे चालू आहेत. तरी लवकरात लवकर चौकशी करून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी तसेच बिनकामाच्या ग्रामपंचायत बॉडीस बरखास्त करण्यात यावे, ही मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे माजी सरपंच नितीन गाडे व ग्रामस्थांनी केली आहे.
--