आशा उबाळेंच्या बदलीची मागणी
By admin | Published: June 16, 2015 12:09 AM2015-06-16T00:09:56+5:302015-06-16T00:09:56+5:30
महापालिका शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकारी आशा उबाळे नियमबाह्य कामकाज करीत असल्याचा आरोप
पिंपरी : महापालिका शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकारी
आशा उबाळे नियमबाह्य कामकाज करीत असल्याचा आरोप
शिक्षक व केंद्रप्रमुखांनी केला आहे. बदलीसाठी २०जूनला पुण्यातील शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर शिक्षक धरणे आंदोलन करणार आहेत. आरोपांचा इन्कार प्रशासन अधिकाऱ्यांनी केला आहे.
महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभेने प्रसिद्धिपत्रक दिले आहे.
उबाळे यांच्या कारकिर्दीत अनागोंदी कारभार, नियमबाह्य कामकाज सुरू असून, अनेक कायदे, धोरणांच्या अंमलबजावणीला केराची टोपली दाखविली जाते, याबाबत वारंवार तक्रारी करूनही त्याची दखल घेतली गेलेली नाही. आरटीई नियमाचा भंग करणाऱ्या शाळांना स्वमान्यतेचे पत्र दिले, असे पत्रकात नमूद केला आहे.
याबाबत प्रशासन अधिकारी आशा उबाळे म्हणाल्या,
‘‘महिला अधिकाऱ्याला जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे. गेल्या दोन वर्षांपासून ही संघटना विनाकारण त्रास देत आहे. आक्षेप चुकीचे आहेत.’’(प्रतिनिधी)