रस्त्याचे चौपदरीकरण करण्याची मागणी
By admin | Published: December 22, 2016 11:49 PM2016-12-22T23:49:53+5:302016-12-22T23:49:53+5:30
नातेपुते, वालचंदनगर, कळस, भिगवण हा पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा मार्ग आहे. त्याचे चौपदरीकरण करण्याची गरज आहे. हा
कळस : नातेपुते, वालचंदनगर, कळस, भिगवण हा पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा मार्ग आहे. त्याचे चौपदरीकरण करण्याची गरज आहे. हा मार्ग कऱ्हाड ते अहमदनगर असा जोडला आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये दक्षिणेकडून उत्तरेकडे जाणारा हा प्रमुख मार्ग आहे. तसेच पुणे-सोलापूर, पुणे-पंढरपूर या मार्गांना ओलांडून जाणारा मार्ग आहे.
कऱ्हाडवरून पुढे यामार्गे कर्जत, अहमदनगरला जाण्यासाठी हा मार्ग जवळचा आहे. या मार्गावर शिखर शिंगणापूरचा मोठा महादेव, औंध देवस्थान, गोंदवलेमहाराज ,बाबीरबुवा ही तिर्थक्षेत्रे आहेत. तसेच या मार्गावर अनेक साखर कारखाने, विविध शैक्षणिक संस्था असून फळबागा व कृषी उत्पादनांची निर्मिती होणारा हा भाग आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सर्व पालखी महामार्गांना जोडणारा हा मार्ग आहे. त्यामुळे या मार्गावर वाहतूक मोठ्या प्रमाणावर असते.
पश्चिम महाराष्ट्रातील जवळपास सर्व महामार्ग मंजूर झाले आहे. त्यांची कामेही प्रगतीपथावर आहेत. फक्त या मार्गाचेच चौपदरीकरण होणे बाकी आहे. ही बाब आमदार रामहरी रूपनवर यांनी मागील काही महिन्यात केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यावर गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन या उपेक्षित मार्गाचे लवकरच चौपदरीकरण करण्याची आश्वासन दिले होते. या भागाला न्याय दिला जाईल, असे सांगितले दिले. मात्र त्याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.(वार्ताहर)