बियाण्यांची मागणी आता महाडीबीटीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:14 AM2021-08-27T04:14:58+5:302021-08-27T04:14:58+5:30

पुणे : कृषी विभागाने बियाण्यांच्या मागणीसाठी महाडीबीटी पोर्टलचा वापर सुरू केला आहे. रब्बी हंगामातील बियाण्यांची मागणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी या ...

Demand for seeds is now on Mahadibt | बियाण्यांची मागणी आता महाडीबीटीवर

बियाण्यांची मागणी आता महाडीबीटीवर

Next

पुणे : कृषी विभागाने बियाण्यांच्या मागणीसाठी महाडीबीटी पोर्टलचा वापर सुरू केला आहे. रब्बी हंगामातील बियाण्यांची मागणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी या पोर्टलचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

हरभरा व ज्वारीच्या बियाणांची रब्बीसाठी मागणी करण्याचे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक ज्ञानेश्वर बोटे यांनी केले. सरकारकडून प्रमाणित बियाणे शेतकऱ्यांना दिले जाते. त्यावर अनुदान मिळते. प्रत्येकी कमाल दोन हेक्टरपर्यंत हे बियाणे मिळते. येत्या १० सप्टेंबरपर्यंत महाडीबीटी पोर्टलवरच बियाण्याची मागणी नोंदवता येणार आहे. येथील सगळी माहिती एकत्रित करून बियाणे पुरवठादार कंपन्यांकडे मागणी नोंदवली जाईल. तिथून ती जिल्हानिहाय व तालुकानिहाय वितरीत होईल. त्यासाठी महाडीबीटी पोर्टलवरूनच शेतकऱ्यांना विक्रेत्याचे नान, त्याला दाखवण्यासाठीचे चलन मिळेल. यामुळे शेतकऱ्यांना वेळेत बियाणे मिळू शकेल, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे.

Web Title: Demand for seeds is now on Mahadibt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.