भिगवण शहरात दुय्यम निबंधक कार्यालय करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:11 AM2021-07-31T04:11:16+5:302021-07-31T04:11:16+5:30

इंदापूर तालुक्याची राजकीय राजधानी समजल्या जाणाऱ्या भिगवण शहरात दुय्यम निबंधक कार्यालय मंजूर करण्याची मागणी आता जोर धरू लागली ...

Demand for setting up of secondary registrar's office in Bhigwan city | भिगवण शहरात दुय्यम निबंधक कार्यालय करण्याची मागणी

भिगवण शहरात दुय्यम निबंधक कार्यालय करण्याची मागणी

Next

इंदापूर तालुक्याची राजकीय राजधानी समजल्या जाणाऱ्या भिगवण शहरात दुय्यम निबंधक कार्यालय मंजूर करण्याची मागणी आता जोर धरू लागली असून याबाबत नागरिकांनी गोविंद डी. कराड (नोंदणी उपमहानिरीक्षक मुख्यालय महाराष्ट्र राज्य) यांना तसेच राज्यमंत्री दत्तामामा भरणे यांना निवेदन देत मागणी केली आहे.

भिगवण हे पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील इंदापूर तालुक्यातील प्रमुख गाव आहे. परिसरातील ४० वाड्यावस्त्या आणि तीन तालुक्यांतील अनेक गावांतील दळणवळणाच्या दृष्टीने सोयीचे मानले जाते. इंदापूरपासून ३५ किलोमीटर अंतरावर पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गवर हे शहर वसलेलं आहे. या परिसरातील लोकांना दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्तनोंदणीच्या कामासाठी इंदापूर येथे जावे लागते. अनेक राष्ट्रीयीकृत बँका ,सहकारी पतसंस्था आणि शालेय शिक्षणासाठी शाळा आणि कॉलेजचे या ठिकाणी जाळे पसरले आहे. तर बिल्ट कंपनीसारखा आशिया खंडातील सर्वात मोठा कागद प्रकल्प आणि राज्यातील मोठा मासळी बाजार भिगवण येथे असल्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल येथे होते. यामुळे परिसराला आर्थिक सुबता आहे. पर्यायाने मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्रीचे व्यवहार होत असतात. यासाठी नागरिकांना अत्यंत मौल्यवान वेळ व पैसा खर्च करून इंदापूर येथील कार्यालयात जावे लागते. भिगवण येथे कार्यालय मंजूर झाल्यास त्याचा फायदा भिगवण आणि परिसरातील नागरिकांना होणार आहे. तर यातून शासनाचा महसूल वाढण्यास मदत होणार आहे. याचाच विचार करून दुय्यम निबंधक कार्यालय मंजुरी देण्याची मागणी केली जात असल्याचे अॅड. पांडुरंग जगताप व सामाजिक कार्यकर्ते राहुल धांडे यांनी सांगितले. जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, इंदापूर पंचायत समितीचे उपसभापती संजय देहाडे, भिगवण गावचे सरपंच तानाजी वायसे ,पराग जाधव, शंकरराव गायकवाड, प्रशांत शेलार,जयदीप जाधव,तुषार क्षीरसागर,कपिल भाकरे,सत्यवान भोसले यांनी ही मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

Web Title: Demand for setting up of secondary registrar's office in Bhigwan city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.