जेजुरीतील मोकाट डुकरांचा बंदोबस्ताची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:11 AM2021-05-22T04:11:19+5:302021-05-22T04:11:19+5:30

--- जेजुरी : जेजुरी शहरात मोकाट डुकरांचा एवढा सुळसुळाट झाला आहे की, दररोज या जनावरांमुळे अपघात होत आहेत. तसेच ...

Demand for settlement of Mokat pigs in Jejuri | जेजुरीतील मोकाट डुकरांचा बंदोबस्ताची मागणी

जेजुरीतील मोकाट डुकरांचा बंदोबस्ताची मागणी

Next

---

जेजुरी : जेजुरी शहरात मोकाट डुकरांचा एवढा सुळसुळाट झाला आहे की, दररोज या जनावरांमुळे अपघात होत आहेत. तसेच अनुचित प्रकार घडत आहेत. जेजुरी पालिका प्रशासनाने येत्या तीन आठवड्यांत या डुकरांचा बंदोबस्त करावा; अन्यथा येत्या ११ जूनपासून आपण स्वतः जेजुरी नगरपालिकेसमोर आंदोलन करणार असल्याचा इशारा माजी नगरसेवक हेमंत सोनवणे यांनी दिला आहे. विशेष म्हणजे हेमंत सोनवणे यांच्या पत्नी वीणा सोनवणे या स्वतः पालिकेच्या नगराध्यक्षा असल्याने त्यांच्या या इशाऱ्यामुळे पालिका प्रशासनात खळबळ माजली आहे.

जेजुरी शहर हे तीर्थक्षेत्र असल्याने येथे बाहेरून येणाऱ्या भाविकांची संख्या खूप आहे. शिवाय लगतच औद्योगिक वसाहत असल्याने शहराची लोकसंख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. पालिकेकडून शहराच्या विकासाबाबत पालिकेकडून प्रयत्न आहेत; मात्र अनेक वर्षांपासून जेजुरी शहरातील मोकाट डुकरांचा प्रश्न प्रलंबित राहिलेला आहे. मध्यंतरी डुकरांच्या बंदोबस्तासाठी पालिकेकडून प्रयत्न झाले. मात्र ती मोहीम बंद पडलेली आहे. शहरातील मोकाट डुकरांचे कळपचे कळप सर्वत्र फिरताना दिसत आहेत. या डुकरांनी अनेकांवर हल्ला केलेला आहे. शिवाय रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनांना धडकल्याने गंभीर अपघात ही झालेले आहेत.

गेल्या आठवड्यात स्वतः हेमंत सोनवणे यांच्या दुचाकीला मोकाट डुकराची धडक बसल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. याशिवाय गेल्या दोन-तीन वर्षांत अनेकांना या जनावरांपासून त्रास झालेला आहे. एका महिलेला दोन वर्षांपासून डुकरांच्या धडकेमुळे अंथरुणावर पडून राहावे लागले आहे. कायमची अपंगत्व आलेले आहे.

तीन आठवड्यांत या डुकरांचा पूर्ण बंदोबस्त न झाल्यास आपण पालिकेसमोर आंदोलनास बसणार आहोत. याशिवाय हा विषय पालिका प्रशासनाने गांभीर्याने घेेऊन कार्यवाही न केल्यास पालिका प्रशासनाची तक्रार राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडेही करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

--

कोट

यापूर्वीही पालिकेकडून डुकरांच्या बंदोबस्तासाठी मोहीम राबवलेल्या आहेत. डुक्कर पाळणारे मालक मोहीम सुरू असताना जनावरे शहरातून बाहेर हलवतात आणि मोहीम थंडावली की ती पुन्हा शहरात आणत असल्याचे निदर्शनास येत आहे. प्रशासनाने आता कडक धोरण अवलंबले असून डुक्कर पाळणाऱ्या व्यक्तींना आता पुन्हा एकदा रीतसर नोटिसा देण्यात आलेल्या आहेत. लॉकडाऊनचा कालावधी संपला की, मोहीम राबविण्यात येणार आहे.

-पूनम कदम, मुख्याधिकारी, जेजुरी नगरपालिका

Web Title: Demand for settlement of Mokat pigs in Jejuri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.