‘सिलपॉलिन’ची मागणी वाढली
By Admin | Published: January 11, 2017 03:32 AM2017-01-11T03:32:11+5:302017-01-11T03:32:11+5:30
सुप्रीम इंडस्ट्रीज लि. च्या सिलपॉलिन या प्लॅस्टिक ताडपत्र्यांमधील वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मामुळे त्याची मागणी वाढत आहे. महाराष्ट्रात सर्वत्र प्रतिसाद मिळत आहे.
पुणे : सुप्रीम इंडस्ट्रीज लि. च्या सिलपॉलिन या प्लॅस्टिक ताडपत्र्यांमधील वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मामुळे त्याची मागणी वाढत आहे. महाराष्ट्रात सर्वत्र प्रतिसाद मिळत आहे. या प्लॅस्टिक ताडपत्र्या ४५, ७०, ९०, १२०, १५०, २००, २५० व ३०० जी. एस.एम.मध्ये हव्या त्या आकारात उपलब्ध आहेत. कमी अधिक जाडीमध्ये सिलपॉलिन सर्वत्र मिळत असल्यामुळे या ताडपत्र्यांचा उपयोग वेगवेगळ्या ठिकाणी करता येतो. या दिसायला पातळ, वजनाला हलक्या परंतु ताकदीच्या व जास्त टिकाऊ आहेत. सिलपॉलिन स्वीस टेक्नॉलॉजीने तयार केल्या असून बी. आय.एस. (आय.एस.) स्टॅण्डर्स १४६११-२०१६ अनुसार बनविलेल्या आहेत. सिलपॉलिन ताडपत्र्यांना सुयोग्य प्रकारे यु.व्ही. स्टॅबिलाईज केले जाते, जेणे करून जास्त उन्हात दीर्घकाळ टिकतात. सिलपॉलिन ताडपत्र्या या पेटंटेड उत्पादन असून १०० टक्के जलरोधक आहेत. पुनर्प्रक्रिया करण्यायोग्य तसेच पर्यावरणास हानी न पोहोचविणाऱ्या आहेत. बहुतेक केमिकल्सचा या ताडपत्र्यांवर परिणाम होत नाही. शेतीच्या विविध कामांसाठी या ताडपत्र्या उपयुक्त आहेत. ३५ जी. एस.एम. सिलपॉली लायनरचा उपयोग प्रामुख्याने वीटभट्टी व्यवसायामध्ये होतो.
मागील काही महिन्यांपासून काही व्यापारी हलक्या प्रतीचे प्लॅस्टिक वापरून सिलपॉलिन ताडपत्र्यांसारखी दिसणारी ताडपत्री विकत आहेत. मात्र हे सर्व एल.डी. प्लॅस्टिक आहे. सिलपॉलिन हा ब्रॅन्ड दि सुप्रीम इंडस्ट्रीज लि.ने उत्पादित केलेला असून, सुप्रीम इंडस्ट्रीज ही भारतातील सर्वांत मोठी प्लॅस्टिक उत्पादक कंपनी आहे, त्यामुळे सुप्रीम इंडस्ट्रीज लि.ने उत्पादित केलेले सिलपॉलिन खरेदी करावे. सिलपॉलिनच्या ताडपत्र्या महाराष्ट्रातील सर्व प्रमुख शहरांमध्ये सहजपणे उपलब्ध आहेत. (वा. प्र.)