पीएमपीएल चौफुलापर्यंत सुरु करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 04:07 AM2020-12-28T04:07:32+5:302020-12-28T04:07:32+5:30
कोरोनामुळे रेल्वे सेवा पूर्णपणे बंद असून सर्व प्रवाशांना चौफुला मार्गे पुण्याला जावे लागत आहे. हा प्रवास खासगी वाहनांनी करताना ...
कोरोनामुळे रेल्वे सेवा पूर्णपणे बंद असून सर्व प्रवाशांना चौफुला मार्गे पुण्याला जावे लागत आहे. हा प्रवास खासगी वाहनांनी करताना खूप महागडा व कसरतीचा होत आहे.
१५ दिवसापूर्वी पीएमपीएल ने हडपसर ते यवत तालुका दौंड इतपर्यंत सेवा सुरू केली आहे. थोडी आणखी पुढे चौफुला पर्यंत सुरू केल्यास प्रवाशांची गैरसोय होणार नाही. खाजगी वाहनांनी प्रवास करताना सुमारे शंभर ते दोनशे रुपये मोजावे लागतात. त्याचबरोबर त्या वाहनांच्या भरतीवर वाहन निघण्याचे ठरते. प्रवाशांचा वेळ तर जातोच त्यासोबत पैसे देखील अधिक मोजावे लागतात व प्रवासात धोकादेखील उद्भवतो. ही बस सेवा सुरू झाल्यावर अगदी वेळेवर नोकरीच्या ठिकाणी पोहोचता येईल अशी प्रवाशांची मागणी आहे.
लॉकडाउन पूर्वी सुमारे केडगाव रेल्वे स्टेशन वरून सुमारे दोन हजारापेक्षा अधिक प्रवाशांचे रेल्वेने दिवसभरात जाणे येणे होते. काही लोकांनी जाण्या-येण्याच्या वांद्यामुळे सरळ व्यवसायांमध्ये उतरण्याचा किंवा शेती सारखे पर्याय निवडले आहेत.तर काहींच्या नोकरी गेल्या आहेत.भविष्यात पी.एम.पी.एम.एल चौफुला पर्यंत सुरू करावी अशी मागणी भीमा पाटसचे माजी उपाध्यक्ष आनंद थोरात यांनी केली आहे.