दुय्यम निबंधक कार्यालय सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:08 AM2021-06-03T04:08:37+5:302021-06-03T04:08:37+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आले. त्या दरम्यान वाघोली येथील दुय्यम निबंधक कार्यालय बंद करण्यात आले. ते अद्यापही सुरू झाले ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आले. त्या दरम्यान वाघोली येथील दुय्यम निबंधक कार्यालय बंद करण्यात आले. ते अद्यापही सुरू झाले नसल्यामुळे नागरिकांना दस्त नोंदणीसाठी पुणे शहरात जावे लागत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेतला नागरिकांना पुणे शहरात जाऊन जोखीम पत्करावी लागत आहे. नागरिकांचा वेळ वाया जात असून मोठी धावपळ करावी लागत आहे. त्यामुळे वाघोली येथील शासनाच्या नियमांचे पालन करून दुय्यम कार्यालय सुरू केल्यास दस्त नोंदणीसाठी नागरिकांची धावपळ होणार नाही व नागरिकांना कोरोना संसर्गापासून काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. लवकरच दुय्यम निबंधक कार्यालय सुरू होणार असल्याचे अॅड. शरद बांदल यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे हवेली तालुकाध्यक्ष व संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीचे हवेली तालुकाध्यक्ष योगेश बाळासाहेब शितोळे, राजेंद्र वारघडे उपस्थित होते.